Homeदेश-विदेशदक्षिण राज्यात हिंदी विरोधी कायदा भाजप कनेक्शन तामिळनाडू सरकारने राज्यात हिंदीवर बंदी...

दक्षिण राज्यात हिंदी विरोधी कायदा भाजप कनेक्शन तामिळनाडू सरकारने राज्यात हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणले


हे राज्य सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार आहे: तामिळनाडू सरकार राज्यात हिंदी भाषेवर बंदी घालणारे विधेयक मांडणार आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन विधानसभेच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकाचा उद्देश संपूर्ण तामिळनाडूमध्ये हिंदी होर्डिंग्ज आणि हिंदी भाषेतील चित्रपटांवर बंदी घालण्याचा आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रुपयाऐवजी वेगळ्या चिन्हानेही वाद

या वर्षाच्या सुरुवातीला, राज्य सरकारने त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पासाठी अधिकृत भारतीय रुपया चिन्ह ‘₹’ ऐवजी तमिळ अक्षर ‘ரு’ असे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरुनही बराच वाद झाला होता. आता या नव्या कायद्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोठ्या वादाला फुटलेलं तोंड

स्टॅलिन यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचे अनावरण करण्यापूर्वी रुपयाचं अधिकृत चिन्ह न वापरता वेगळं चिन्ह वापरल्याचं समोर आला.  त्यावेळी अधिकृत कागदपत्रांवर प्रादेशिक भाषांचा वापर वादाचा मुद्दा ठरला होता. तेव्हा द्रमुकने स्थानिक भाषांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हणत आपला कठोर विरोध नोंदवला होता.

हिंदी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

हिंदी तामिळनाडूवर ‘लादली’ गेली नाही तर द्रमुक हिंदीला विरोध करणार नाही, असं द्रमुकने म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, तमिळ लोकांवर भाषा लादणे हे त्यांच्या स्वाभिमानाशी खेळण्यासारखे असून त्याला कठोर विरोध केला जाईल. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषिक सूत्राद्वारे हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप द्रमुकने केला होता, परंतु केंद्र सरकारने हा आरोप फेटाळून लावला होता.

भाजप दक्षिणेकडील राज्याशी ‘विश्वासघात’ करतंय

मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. राज्य भाजपच्या त्रिभाषिक सूत्राच्या नावाखाली ‘हिंदी आणि नंतर संस्कृत लादण्याच्या’ प्रयत्नांना विरोध करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेले. त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन म्हटले होते की, राज्याच्या द्विभाषिक धोरणामुळे (तमिळ आणि इंग्रजी) शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात राज्याची कामगिरी चांगली झाली आहे. भाजप दक्षिणेकडील राज्याशी ‘विश्वासघात’ करत आहे. भाषा आणि स्थानिक लोकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असंही एम.के. स्टॅलिन यांनी त्यावेळीच स्पष्ट केलं होतं.

आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या हिंदी विरोधी विधेयकावर भाजपा काय प्रतिक्रिया देणार? आपली भूमिका मांडताना काय म्हणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!