Homeदेश-विदेशव्हायरल व्हिडिओ मिठी मारतात आणि चुंबन घेतात हमास अनेक इस्त्रायलींना रिलिझ करते...

व्हायरल व्हिडिओ मिठी मारतात आणि चुंबन घेतात हमास अनेक इस्त्रायलींना रिलिझ करते कारण एकट्याने 738 दिवसांनंतर कौटुंबिक जोडप्यासह भावनिक क्षणाला एकत्र केले


इस्त्रायली ओलीस हमास व्हिडिओद्वारे मुक्त: इस्रायल आणि हमासमध्ये (Israel Vs Hamas) सुरू असणारा संघर्ष अतिशय रक्तरंजित वळणावर पोहोचला. अनेक निष्पापांचे यात बळीसुद्धा गेले. ज्यानंतर आता हमासकडून ओलीस ठेवलेल्या 202 इस्रायली नागरिकांची सुटरा करण्यात आली. दोन वर्षं अर्थात 738 दिवसांनंतर हे इस्रायली नागरिक त्यांच्या कुटुंबीयांना भेटले. truce deal चाच एक भाग म्हणून त्यांची सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी सुटका करण्यात आली आणि संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडे वेधलं.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

आपल्या माणसांना, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना समोर पाहिल्यानंतर या इस्रायली नागरिकांच्या भावनांचा बांध फुटला, अनेकांच्या आप्तेष्टांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, ओक्साबोक्ती रडतच कुटुबीयांनी या मंडळींना कडकडून मिठी मारली. भावनांचा हा मेळ साधणाऱ्या क्षणांचे काही व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर समोर आले.

दोन वर्षं… तब्बल 738 दिवस म्हणजेच 177125 तासांनंतर…

सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये इस्रायली तरुण त्याच्या प्रेयसीला कडकडून मिठी मारताना दिसत आहे. दोन वर्षं… तब्बल 738 दिवस म्हणजेच 177125 तासांनंतर..हमासच्या ताब्यातून सुटका होताच त्याच्या समोर ती आली आणि तिला डोळे भरून पाहिल्यानंतर मिठी मारण्यावाचून त्याला व्यक्तच होता आलं नाही. एकमेकाप्रती असणारं त्यांचं हे प्रेम संघर्षाच्या काळात टिकून राहिलं आणि त्यावर या दोघांनी मात केली हेच व्हिडीओ पाहताना प्रतीत होतं.

Israel Defense Forces (IDF) आयडीएफनंही या गोड क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे. दोन वर्षांपूर्वी Argamani  आणि Avinatan Or या दोघांनी Nova Music Festival ला हजेरी लावली होती. मात्र तिथं क्षणात सारंकाही बदललं. हजारो तरुण- तरुणी तिथं सैरावैरा पळू लागले, आपल्याला मारु नका अशी गयावया ते शस्त्रधाऱ्यांना करत होते, असं सांगताना या तरुणीनं आपण आपल्या जोडीदाराला अखेरचं 7 ऑक्टोबरला दोन वर्षांपूर्वी पाहिलं होतं. दरम्यान Argamani नावाच्या या चिनी- इस्रायली तरुणीला गेल्याच वर्षी जून महिन्यास आयडीएफनं हमासच्या ताब्यातून सोडवलं होतं, जेव्हापासून तिनं ओलीसांच्या सुटकेसाठीचा कायदेशीर लढा सुरू ठेवला.

भावनेची भेट आणि आनंदाचे अश्रू…

हमासनं इस्रायली ओलिसांना सोडल्यानंतर त्यांच्या आप्तजनांच्या अश्रूंचा बांध फुटला. दोन वर्षांनंतर आपल्या माणसांसमवेत सुरक्षित वातावरणात पोहोचलेल्या या ओलिसांना कसं व्यक्त व्हावं हेच कळेना. कत्यांची प्रतीक्षा संपली होती… कुठं मुलाला पाहून वडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर कुठे आईनं लेकरांना मिठीत घेतलं. दोन वर्षे मनात दाबून ठेवलेली भीती, अश्रू, सारंकाही या क्षणी रितं झाल्याचच व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. जागतिक स्तरावर सध्या याच वृत्तानं सर्वांचं लक्ष वेधलं असून, हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शेवटी देश, प्रांत आणि भाषा कोणतीही असली तरीही भावना त्याच असतात… आपुलकीच्या, सुरक्षिततेच्या आणि प्रेमाच्या!!!

FAQ

हमासने कोणत्या इस्रायली ओलीसांची सुटका केली?
हमासने 202 इस्रायली नागरिकांची सुटका केली. यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा समावेश आहे, ज्यांना दोन वर्षे (738 दिवस) ओलीस ठेवण्यात आले होते.

सुटकेनंतर कुटुंबीयांच्या भावनिक क्षणांचे वर्णन कसे आहे?
सुटकेनंतर ओलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भावनांचा बांध फुटला. अनेकांनी रडत ओक्षाबोक्ती मिठी मारली, प्रेमाचा वर्षाव केला.

ही सुटका कशामुळे आणि कधी झाली?
ही सुटका इस्रायल आणि हमासमधील truce deal चा भाग आहे. 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यानंतर दोन वर्षे (738 दिवस) झाल्यानंतर 13 ऑक्टोबर 2025 रोजी ही घटना घडली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!