Homeदेश-विदेश...म्हणून बापानं 19 वर्षीय जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध; जेवणाला गावाला बोलवलं

…म्हणून बापानं 19 वर्षीय जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध; जेवणाला गावाला बोलवलं


मुलीसाठी फादर श्रद्धा विधी: कर्नाटकच्या बेळगावात जन्मदात्या बापाने आपल्या जिवंत मुलींचं श्राद्ध घातल्याची घटना घडलीय. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून बापानेही कृत्य केलंय. सोबतच बापाने संपूर्ण गावासह पै पाहुण्यानाही श्राद्ध जेवणासाठी बोलावलं होतं. जिवंत मुलीच्या श्राद्धाची घटना पाहून गावही आचंबित झालंय.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

बापाने जिवंतपणीच मुलीचं श्राद्ध घातल्याची घटना कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. आपली लाडकी लेक प्रियकरासोबत पळून गेल्याचं जिव्हारी लागल्याने संतापलेल्या बापाने हे पिंडदान केलंय. एवढ्यावरच न थांबता एक तिथी काढून त्याने संपूर्ण गावासह पै-पाहुण्यांसाठी जेवणही ठेवलं होतं. मुलीचे वडील शिवगौडा पाटील यांनी गावकरी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलीच्या फोटोला फुलं वाहून पिंडदान विधी केला. तसेच मृत व्यक्तीला अर्पण करतात तशीच श्रद्धांजली अर्पण केली. सोबतच या विधीत त्यांनी मुलीसोबतचे कुटुंबाचे संपूर्ण नातेसंबधही तुटल्याचं जाहीर करून टाकलंय.

रायबाग तालुक्यातील नागराळ गावातील 19 वर्षीय तरुणी सुश्मिता हिचं गावातील विठ्ठल बस्तवाडे नावाच्या 29 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. विठ्ठल बस्तवाडे हा तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण सुश्मिताच्या कुटुंबीयांचा अशा प्रेमसंबंधांना विरोध असल्याने दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र लाडक्या लेकीचं कृत्याने घराण्याच्या संस्काराला धक्का बसला या विचाराने वडील अत्यंत दुःखी झाले. तसेच आपल्यासाठी आता मुलगी जणू ‘मेली’ आहे, असे समजून त्यांनी मुलीच्या जिवंतपणीचं तिचं श्राद्ध घातलं आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा निषेध केला असून शिवगौड पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केलीय.

https://www.youtube.com/watch?v=liapfxowcny

वडिलांकडूनच मुलीचे जिवंतपणे श्राद्ध ही घटना समाजातील मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. स्थानिक प्रशासनाला या प्रकारावर संवेदनशील आणि परिणामकारक उपाययोजना करावी लागणार आहे. तसेच सर्वच पालकांनी मुलाच्या व्यक्ति स्वातंत्र्यांचा आदर करायला हवा.

FAQ

प्रश्न १: ही घटना कुठे आणि कशाबाबत आहे?
उत्तर: ही घटना कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात घडली. जन्मदात्या बापाने आपल्या जिवंत १९ वर्षीय मुलीचे श्राद्ध केले. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून हे कृत्य केले गेले.

प्रश्न २: मुलीचे नाव आणि तिचा प्रियकर कोण?
उत्तर: मुलीचे नाव सुश्मिता आहे. तिचा प्रियकर विठ्ठल बस्तवाडे (वय २९ वर्षे) आहे, जो तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि लग्न करण्याची इच्छा होती.

प्रश्न ३: बापाने श्राद्ध कसे केले?
उत्तर: बाप शिवगौडा पाटील यांनी गावकरी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलीच्या फोटोला फुले वाहून पिंडदान विधी केला. मृत व्यक्तीला अर्पण करतात तशी श्रद्धांजली अर्पण केली. एक तिथी काढून संपूर्ण गाव आणि पै-पाहुण्यांसाठी जेवण ठेवले.

प्रश्न ४: बापाने आणखी काय जाहीर केले?
उत्तर: श्राद्ध विधीत बापाने मुलीसोबतचे कुटुंबाचे संपूर्ण नाते-संबंध तुटल्याचे जाहीर केले. लाडकी लेक पळून गेल्याने घराण्याच्या संस्कारांना धक्का बसला, म्हणून मुलगी “मेली” समजून हे पिंडदान केले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्राचे राशी परिवर्तन आज:शुक्रासाठी शिवपूजा आणि दुधाचे दान करा, जाणून घ्या 1 ऑगस्टपर्यंतचा काळ...

0
आज (4 जुलै) दुपारी सुमारे 4 वाजता शुक्र राशी बदलून सिंह राशीत येईल. त्यानंतर हा ग्रह 1 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. शुक्र वृषभ...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
spot_img

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...
error: Content is protected !!