Homeदेश-विदेशमुंबई मनपा निवडणुकांच्या तोंडावर शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? दसऱ्यालाच...

मुंबई मनपा निवडणुकांच्या तोंडावर शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? दसऱ्यालाच धमाका? जाणून घ्या!


बीएमसी निवडणूक: मुंबई मनपा निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार का? अशी चर्चा रंगलीये. कारण दोन आमदार वगळता सर्व आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी केलाय..तर तुमानेंच्या दाव्यावरून शिवसेना UBTचे नेते आक्रमक झालेत.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

येत्या काही महिन्यात महानगपालिका निवडणुकींचं बिगुल वाजणारय..पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरूय.. दरम्यान या सगळ्या धामधुमीत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडवून दिलीये. लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. ठाकरेंचे एक-दोन आमदार सोडून बाकी सगळे आमदार आणि 80 टक्के माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा बॉम्ब तुमानेंनी टाकलाय. त्यामुळे खरंच शिवसेना UBTला धक्का बसणार का अशी चर्चा रंगलीये. कृपाल तुमानेंच्या दावा खासदार संजय राऊतांनी हाणून पाडलाय. ज्यांचं नशीब फुटलंय ते काय आमचा पक्ष फोडणार असा टोला संजय राऊतांनी लगावलाय.

तर उदय सामंत यांनीही कृपाल तुमानेंच्या दाव्याला दुजोरा दिलाय. दिवाळीत धमका होईल असं म्हणत मंत्री उदय सामंतांनीही खळबळ उडवून दिलीये.

कृपाल तुमानेंच्या दाव्यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्यात. जर खरंच कुणी ठाकरेंची साथ सोडणार असेल तर ते आमदार नेमके कोण असतील असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. केवळ शिंदेंची शब्बासकी मिळवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याची टीका शिवसेना UBTचे महेश सावंतांनी केलीये.

लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेल्या यशानंतर शिवसेना UBTमध्ये मोठं इनकमिंग झालं. मात्र विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आऊटगोईंगही तेवढ्याच प्रमाणात वाढलं. आतापर्यंत निष्ठावंत मानल्या जाणा-या अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडलीये. त्यामध्ये  राजन साळवी, चंद्रहार पाटील, सुधाकर बडगुजर, राजू शिंदे आणि विलास शिंदे अशा नावांचा समावेश आहे.

दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. तुमानेंच्या दाव्यानुसार दसऱ्यालाच धमाका होणार आहे,. त्यामुळे खरंच तुमानेंच्या दाव्यात तथ्य असेल तर कोणते आमदार आणि नगरसेवकर शिंदेंच्या गळाला लागतील हे पाहावं लागणार आहे,

FAQ

प्रश्न: कृपाल तुमाने यांनी शिवसेना (UBT) बाबत कोणता दावा केला आहे आणि त्यावर शिवसेना (UBT) नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे?

उत्तर: शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांनी दावा केला की, शिवसेना (UBT) चे एक-दोन आमदार वगळता सर्व आमदार आणि ८०% माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या दाव्यावर शिवसेना (UBT) चे खासदार संजय राऊत यांनी, “ज्यांचे नशीब फुटले आहे, ते आमचा पक्ष फोडणार का?” असा टोला लगावला, तर महेश सावंत यांनी हा दावा शिंदे यांची शाबासकी मिळवण्यासाठी केला गेला असल्याची टीका केली.

प्रश्न: शिवसेना (UBT) मधून कोणत्या नेत्यांनी पक्ष सोडला आणि याचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?

उत्तर: शिवसेना (UBT) मधून राजन साळवी, चंद्रहार पाटील, सुधाकर बडगुजर, राजू शिंदे आणि विलास शिंदे यांनी पक्ष सोडला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाल तुमाने यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. जर आणखी आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात गेले, तर शिवसेना (UBT) ची ताकद कमी होऊन शिंदे गटाला मुंबईत मजबूत पकड मिळू शकते, ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होऊ शकतो.

प्रश्न: कृपाल तुमाने यांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चा कशा रंगल्या आणि दसरा मेळाव्याचे यात काय महत्त्व आहे?

उत्तर: कृपाल तुमाने यांनी दावा केला की, शिवसेना (UBT) चे बहुतांश आमदार आणि माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून, दसऱ्याच्या मेळाव्यात याचा धमाका होईल. याला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे ठाकरे गटातील कोणते आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात जाऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा असून, यावेळी शिंदे गट मोठा राजकीय डाव खेळू शकतो, अशी चर्चा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!