Homeमनोरंजनरोहित शर्मा मुलाखतीत खुलासा करतात की पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना टी -२०...

रोहित शर्मा मुलाखतीत खुलासा करतात की पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना टी -२० विश्वचषक २०२4 च्या आधी धोका होता.

मनोरंजन (क्रीडा): रोहित शर्मा – भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा कधी क्रिकेटच्या मैदानात येतात तेव्हा जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्याकडे असतं. भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नुकतीच जिओ हॉटस्टारला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं सांगितलं की, आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्यापूर्वी संघाला धमकी मिळाली होती. त्यामुळे पूर्ण संघ हॉटेलच्या बाहेर गेला नाही. वर्ल्ड कपच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.

रोहितने जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘भारत – पाकिस्तान सामन्यापूर्वी आम्हाला सांगण्यात आले होते की एक धमकी आली आहे, काही तरी सुरुये. त्यामुळे सामन्याच्या दोन दिवस आधी आम्हाला हॉटेलमधून बाहेर जाण्याची परवानगी नव्हतो. माहोल बनणं तिथेच सुरु झालं होतं. आम्ही जेवण ऑर्डर करायचो आणि हॉटेल पूर्ण भरलेलं होतं. चालणं सुद्धा अवघड झालं होतं. फॅन्स, मीडिया सगळेच तिथे होते. तेव्हाच तुम्हाला जाणीव होते की ही केवळ एक मॅच नाही तिथे काहीतरी खास होणार आहे. आम्ही जसं स्टेडियमच्या जवळ पोहोचलो तिथे पहिल्या पासूनच उत्सवाचा माहोल होता. भारतीय फॅन्स, पाकिस्तानी फॅन्स सर्व नाचत होते.

पाकिस्तान विरुद्ध अनेक सामने खेळलेल्या रोहित शर्माने सांगितले की, न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्याचा अनुभव काही वेगळाच होता. कारण दोन्ही संघाच्या फॅन्समध्ये मोठी ऊर्जा होती. रोहित म्हणाला, ‘मी अजून पर्यंत अनेक भारत – पाकिस्तान सामने खेळले आहेत, मी संख्या सुद्धा विसरलोय. पण ती प्री मॅच ऊर्जा, ती भावना नेहमी काही वेगळीच असते. त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही’.

हेही वाचा : Shikhar Dhawan लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! पण रोहित शर्माने…

पाकिस्तान विरुद्ध या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 19 ओव्हरला 119  धावांवर ऑलआउट झाले. यावेळी ऋषभ पंतने नंबर 3 वर येऊन 31 बॉलमध्ये 42 धावांची खेळी केली. रोहित शर्माने यावेळी म्हटले की, ‘आम्हाला वाटत होते की फक्त ऋषभ जे सर्वोत्तम करतो ते त्यावेळी करावे, गोलंदाजांना त्रास द्यावा, मोकळेपणाने खेळावे अशी आमची इच्छा होती आणि त्याने ते उत्तम प्रकारे केले. त्याची खेळी सुमारे 42 धावांची होती आणि त्या खेळपट्टीवर ती 70 धावांप्रमाणे होती’. त्यानंतर जसप्रीत बुमराहने तीन विकेट्स घेत भारताला पाकिस्तानला रोखण्यात आणि सहा धावांनी विजय मिळवून देण्यात मदत केली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!