Homeमनोरंजनआपल्या स्मार्टफोनमध्ये स्मार्टफोन आयआर ब्लास्टर सीक्रेट होल त्याचा वापर काय आहे

आपल्या स्मार्टफोनमध्ये स्मार्टफोन आयआर ब्लास्टर सीक्रेट होल त्याचा वापर काय आहे

मनोरंजन (टेक) :  स्मार्टफोन हॅक्स: स्मार्टफोनचा वापर आजकाल दररोज होताना दिसतोय. स्मार्टफोनमध्ये अलीकडच्या काळात अनेक इन बिल्ट फिचर्स आहेत ज्यामुळं तुमच्या रोजच्या आयुष्यातील गोष्टी फार सोप्या होतील. मात्र काही Keys किंवा फंक्शन असे असतात जे कित्येकांना ठावूक नसतात. तुम्ही कधी स्मार्टफोनच्यावर एक छोटेसे छिद्र पाहिले आहे का. अनेकजण ही डिझाइन असल्याचे समजून सोडून देतात किंवा मायक्रोफोन वा सेन्सर असल्याचा समज करुन घेतात. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हे छोटेशे छिद्र खरं म्हणजे फार कामाचा भाग आहे. ज्याला IR Blaster असं म्हणतात. हे तुमचा फोन युनिव्हर्सल रिमोटमध्ये बदलू शकतात. ज्यामुळं तुम्ही  घरातील टीव्ही, एसी, सेटटॉप बॉक्स आणि अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नियंत्रणात  ठेवू शकतात. जाणून घेऊयात ही ट्रिक कशी काम करते.

तुमच्या फोनमध्ये लपलेला हा छोटासा रिमोट कंट्रोल खूप कामाचा आहे. याला  IR Blaster असं म्हटलं जातं. हे एक छोटेसे हार्डवेअर कॉम्पोनेंट असतं. हे इन्फ्रारेड लाइट सिग्नल पाठवतात. जसं आपल्या घरातील टीव्ही किंवा एसीसारखे पांरपारिक रिमोट कंट्रोल काम करतात. हे इन्फ्रारेड सिग्नल त्या इलेक्ट्रोनिक डिव्हाइसने रिसिव्ह होतात ज्यात इंफ्रारेड टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात आणि मग कमांडनुसार काम करतात. जसं की चॅनेल बदलणे, आवाज कमी करणे, AC चे टेम्परेचर बदलणे.

कसं काम करतो IR Blaster ?

IR Blaster जर तुम्हाला वापरता येत असेल तर त्यासाठी तुम्हाला कम्पॅटिबल अॅप डाउनलोड करण्याची गरज आहे.

Step  1: अॅप डाउनलोड करा

जर तुमच्या फोनमध्ये IR Blaster आहे तर कंपनीकडून आधीपासून तुमच्या फोनमध्ये रिमोट कंट्रोल अॅप असेल. Xiaomi सारख्या कंपन्या त्यांच्या फोनमध्ये MI Remote अॅप देते.

जर तुमच्या फोनमध्ये आधीपासून अॅप असेल तर तुम्ही IR Blaster साठी Peel Smart Remote, AnyMote Universal Remote + WiFi, किंवा Universal TV Remote Control डाउनलोड करू शकता.

स्टेप 2- डिव्हाइस निवडा आणि कॉन्फिगर करा

जेव्हा पण तुम्ही अॅप ओपन कराल तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला टीव्हीचा ब्रँड उदा सोनी, एलजी किंवा पॅनासॉनिक याची निवड करायची आहे. तुम्ही AC, Tv, Fan सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची निवडदेखील करू शकता. अॅपमध्ये काही टेस्ट सिग्नल पाठवून तुम्ही डिव्हाइससोबत पेअरिंग करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ऑनस्क्रीन इन्स्ट्रक्ंशन फॉलो करावे लागतील. जसं की पॉवर ऑन/ऑफ बटण, व्हॉल्यूम अप/डाउन बटण

स्टेप 3- कंट्रोल सुरू करा

एकदा कॉन्फिगरेशन झाल्यानंतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर डिव्हाइसचा व्हर्चुअल रिमोट बनेल. तुम्ही फोननेच आरामात कंट्रोल करू शकता.

कोणत्या फोनमध्ये असते हे फिचर्स

फोनमध्ये अनेक अपग्रेड होत असतात. जुने फक्ंशन आणि डिझाइन बदलले असतात. IR ब्लास्टर आजच्या जमान्यात सर्व स्मार्टफोन्समध्ये नाहीये. मात्र काही कंपन्या आहेत ज्या पहिलेपासून हे फिचर त्यांच्या फोनमध्ये देतात. जसं की,  Xiaomi, Redmi, Oppo, Poco, Samsung. मात्र Apple युजर्स याचा वापर करू शकत नाही.

आयआर ब्लास्टरचे फायदे काय आहेत?

युनिव्हर्सल रिमोट: तुम्हाला वेगवेगळ्या उपकरणांसाठी वेगवेगळे रिमोट ठेवण्याची आवश्यकता नाही.

किती फायदेशीर?: रिमोट हरवण्याचा किंवा बॅटरी संपण्याचा कोणताही त्रास राहणार नाही. फोन नेहमीच जवळ असतो, त्याद्वारे तो वापरता येतो.

स्मार्ट वापर: काही अ‍ॅप्स कस्टमाइज्ड रिमोट तयार करणे, आवडते चॅनेल सेट करणे किंवा व्हॉइस कमांड देणे यासारखी स्मार्ट वैशिष्ट्ये देखील देतात.

किफायतशीर: जर तुमच्या फोनमध्ये हे वैशिष्ट्य असेल, तर तुम्हाला वेगळे युनिव्हर्सल रिमोट खरेदी करण्याची आवश्यकता नाही.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!