Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, ठाकरे बंधूंच्या 2 जवळच्या नेत्यांची हॉटेलमध्ये भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, ठाकरे बंधूंच्या 2 जवळच्या नेत्यांची हॉटेलमध्ये भेट

महाराष्ट्र (मुंबई) : संदीप देशपांडे आणि वरुण सर्डेसाई: मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र मोर्चा काढणार आहे. दोन्ही पक्षांनी आपण जाहीर केलेल्या तारखांमध्ये बदल केला असून, आता 5 जुलैला हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदीसक्तीवरुन सत्ताधाऱ्यांविरुद्ध विविध पक्ष, संघटना एकत्र येणार आहेत. या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर असतील. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची दादरच्या हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात ही भेट झाल्याचे कळते.

मराठी माणसासाठी सर्व एकत्र येतायत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अशी घटना पहिल्यांदाच घडतेय, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

राज-उद्धव भेटीवर काय म्हणले राऊत?

“राज ठाकरेंनी याबाबत एक कडवट भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरेंनीही ती भूमिका मांडली आहे. मराठीचा विषय असल्याने, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्याने उद्धव ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेत कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तुमच्या लढ्याला, आंदोलनाला पाठिंबा आहे असं जाहीर केलं. त्याचवेळी राज ठाकरेंकडे सरकारचे काही लोक केले. राज ठाकरेंना ते सादरीकरण मान्य नसावं. आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असताना राज ठाकरेंनीही मोर्चाची घोषणा केली. आम्ही आत असल्याने त्याची कल्पना नव्हती,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंचा मला फोन आला. मराठी माणसाचे, मराठी भाषेसंदर्भात दोन मोर्चे निघणं बरं दिसत नाही, एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना आनंद होईल असं त्यांनी सांगितलं. मी उद्धव ठाकरेंशी चर्चा करतो असं सांगितलं. मी पुन्हा मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचं आणि त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं. त्यावर काही आडंवेडं न घेता उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचं ऐक्य दिसणं महत्त्वाचं आगे असं सांगितलं. आपण सगळे मराठी माणसं सक्तीविरोधात एकत्र आहोत आणि वेगळा मोर्चा काढण्याची माझ्या मनात भूमिका नाही असं ते म्हणाले”.

मोर्चाची तारीख

“उद्धव ठाकरेंनी सांगितलं, 6 तारखेला आषाढी असल्याने आपण 7 तारीख ठरवली होती. सगळीकडे आषाढीचा उत्साह असताना मराठी माणसांपर्यंत पोहोचणं अडचणीचं जाईल. आपण एकत्र करणार असू तर काही अडचण नाही. 7 तारखेत त्यांनी सहभागी व्हावं किंवा 5 तारीख करावी असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार राज ठाकरेंशी चर्चा केली आणि उद्धव ठाकरेंशी झालेलं बोलणं सांगितलं. मग त्यांनीही 5 तारखेवर संमती दर्शवली,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.  “हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. 5 तारखेला सकाळची 10 ची वेळ सोयीची नाही. तसंच कुठून कुठपर्यंत जायचं त्यावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागी होणार असल्याने वेळेत बदल करु. त्यासंदर्भात राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करु. मुंबई आणि महाराष्ट्रावर ज्याप्रकारे अतिक्रमण सुरु आहे त्यासंदर्भात भूमिका घेताना आम्ही मराठी माणसात संघर्ष, फूट नाही याची काळजी घेऊ,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!