Homeमहाराष्ट्र'सामना'मधून बबनराव लोणीकर यांच्यावर टीकास्र

‘सामना’मधून बबनराव लोणीकर यांच्यावर टीकास्र

महाराष्ट्र : भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असं विधान करत मतदारांचा बाप काढल्याने टीकेची झोड उठली आहे. “तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत ते आम्हीच दिले,” असं विधान त्यांना जाहीर कार्यक्रमात केल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. ‘सामना’मधून बबनराव लोणीकर यांच्यावर टीकास्र सोडण्यात आलं असून, भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.

“भाजपसारखे पक्ष हे सावकार आणि शेठजींचेच आहेत. आजही ते जनतेला गुलाम किंवा वेठबिगार मानतात. प्रे. ट्रम्प यांच्या पुढे शेपूट घालणारे हे लोक गोरगरीब जनतेच्या अंगावर गाढवासारखे ओरडतात व पुन्हा 50 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीवर प्रवचने झोडतात. पंतप्रधान मोदी हे देशातील 80 कोटी जनतेला पाच-दहा किलो फुकट रेशन देतात ही गरिबीची आणि ‘विकास’ या शब्दाची थट्टाच आहे, पण मोदी हे स्वतःला अवतारी पुरुष मानतात. अशा अवतारी पुरुषाचे भक्त हे लोणीकरांसारखे सावकारच असणार. अवतारी पुरुष 20 हजार कोटींच्या विमानातून मजा मारत जगभर फिरतो. हे विमान ज्या जनतेच्या पैशांतून आले, त्या जनतेला सावकार लोणीकर गुलाम समजत आहेत,” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

“सत्तेचे आणि श्रीमंतीच्या लोण्याचे अनेकांना अजीर्ण होते. त्यातले एक भाजपचे बबन लोणीकर. अशा असंख्य मस्तवाल लोण्यांच्या गोळ्यांनी भाजप तरारून फुगला आहे. भाजपचे आमदार बबन लोणीकर हे भाजपच्या संस्कृतीस स्मरून सामान्य जनता व शेतकऱ्यांना जे म्हणाले ते अमानुष आहे. लोणीकर गोरगरीब जनतेला म्हणाले, “तुमच्या अंगावरचे कपडे, तुमच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये मोदींनी दिले. तुमच्या आईचा पगार मी सुरू केला. ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत आयाबहिणींच्या नावावर पैसे आमच्या सरकारने जमा केले आणि तरीही तुम्ही आमच्याच विरोधात बोलता!’’ मराठवाड्यातील परतूर तालुक्यातील वाटूर गावात ‘हर घर सोलर’ या योजनेचे उद्घाटन करताना लोणीकर यांनी गावकऱ्यांना ‘सत्तेचे डोस’ पाजले. तुम्ही एका सरकारी योजनेचे उद्घाटन करायला आला होतात तर ते करायचे, त्या योजनेचे लाभ आणि इतर जनहिताच्या गोष्टी सांगायच्या आणि मोकळे व्हायचे. मात्र भाजपच्या मंडळींना या सर्व योजना म्हणजे त्यांच्याच खासगी जहागिऱ्या वाटू लागल्या आहेत. त्यातूनच ‘‘तुझ्या बापाला मोदींनी पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले,’’ अशी मस्तवालपणाची भाषा त्यांच्या तोंडातून बाहेर पडू लागली आहे,” असा संताप सामना अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे.

“लाडक्या बहिणींची मते यांना विधानसभा निवडणुकीत गोड वाटली, पण सत्ता मिळाल्यावर मात्र ते या योजनेचे 1500 रुपये उचकटून दाखवीत आहेत. जनतेच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल-बूट आणि हातातील मोबाईल ही सगळी आमचीच कृपा असे सांगण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे. बबनराव, तुमच्या आडनावात ‘लोणी’ असले तरी सत्तेच्या उकळीने बहुधा ते करपले आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेचा, मतदारांचा अपमान करणारी भाषा तुम्ही बिनधास्तपणे करीत आहात. मुख्यमंत्री फडणवीस आता यासंदर्भात काय करणार आहेत? ‘‘मी संबंधितांना समज दिली आहे,’’ असे नेहमीचे तुणतुणे ते वाजवतील. याआधीही त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि पक्षातील बोलभांड नेते यांच्या वाचाळपणाबाबत त्यांनी हेच तुणतुणे वाजवले होते. तरीही लोणीकरांसारखे त्यांचे आमदार जनतेला सत्तेचा माज दाखवीतच आहेत,” अशी टीका करण्यात आली आहे.

“पंतप्रधान मोदी हे स्वतःला जनतेचा ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतःला ‘मोदींचे नम्र सेवक’ संबोधतात, पण त्यांच्या पक्षाची मंडळी मात्र स्वतःला ‘जनतेचे सावकार’ समजायला लागली आहेत. मागील 11 वर्षांत ब्रिटिश राजवटीचे देशी बियाणे आपल्या देशात जास्तच तरारले आहे. त्यातूनच कोणी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपशब्द काढतात, कोणी हिंदूंना भरपूर मुले पैदा करण्याचा सल्ला देतात, कोणी मोदींना विरोध करणाऱयांना पाकिस्तानात चालते होण्याचा आदेश देतात, तर कोणी स्वतःला ‘हिंदूंचा गब्बर’ म्हणत बेताल धरतात. आता या वाचाळवीरांमध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे सहा हजार रुपये उचकटून दाखविणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांची भर पडली आहे,” असा संतापही व्यक्त केला आहे.

“बबनराव, बळीराजाला सहा हजार रुपये तुम्ही, तुमचे मुख्यमंत्री किंवा तुमचे पंतप्रधान स्वतःच्या खिशातून देत नाही. ही मदत सरकारच्या तिजोरीतून दिली जाते आणि सरकारी तिजोरी जनतेच्याच पैशांनी भरत असते. तेच पैसे तुमचे सरकार देत आहे. त्याच्या गमजा कसल्या मारता? सरकारी कृपेने तुम्हालाही ज्या सोयी-सवलती मिळत आहेत, त्यादेखील या जनतेचीच देण आहे. त्या जनतेशी बोलताना किमान तुमच्या आडनावातील ‘लोणी’ या शब्दाचे तरी भान ठेवा. मुळात तुम्ही कोण आहात हो जनतेला देणारे? लोकशाहीत जनताच देणारी असते आणि तिने तुम्हाला मते दिली म्हणूनच तुम्ही आज सत्तेत आहात,” याची आठवण सामनातून करुन देण्यात आली आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!