Homeदेश-विदेशपंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलतात

पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलतात

देश-विदेश  : मोदी-ट्रम्प फोन कॉल: जी-7 परिषदेमध्ये सहभागी होऊन कॅनडामधून मायदेशी परत येण्यासाठी निघालेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. जी-7 परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांची थोडक्यात चुकामूक झाल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही. त्यामुळेच ट्रम्प यांच्या आग्रहास्तव दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. पहलगाममधील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आणि ट्रम्प यांची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मोदींनी पहलगाम हल्ल्यासंदर्भातील माहिती ट्रम्प यांना दिली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. यावेळेस ट्रम्प यांनी मोदींना भेटीसाठी तुम्हाला आताच्या आता अमेरिकेला येता येईल का अशी विचारणाही केली. यावर मोदींनी सध्या तरी अमेरिकेला येणं शक्य नसल्याचं सांगत ट्रम्प यांची विनंती फेटाळली.

ऑपरेशन सिंदूरसंदर्भात मोदींनी

मोदींनी पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या प्रतिहल्ल्याची म्हणजेच ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना, भारताने केलेला लक्ष्यभेद हा अचूक आणि केवळ दहशतवादी तळांवर करण्यात आल्याची माहिती दिली. या चर्चेदरम्यान भारताने कोणताही प्रस्ताव मान्य केला नाही तसेच भविष्यातही भारताला या विषयासंदर्भात कोणत्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं स्पष्टपणे अमेरिकेला कळवण्यात आलं आहे. भारताचे परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री यांनी या चर्चेसंदर्भातील सविस्तर माहिती दिली. मोदींनी ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या शस्रसंधीसंदर्भात अमेरिकेने कोणतीही भूमिका बाजवली नसल्याचं सांगितल्याची माहिती मिस्रींनी दिली.

ट्रम्प यांनी मोदींना दिलं अमेरिका भेटीचं आमंत्रण पण…

यावेळी ट्रम्प यांनी मोदींना, ‘तुम्ही आताच्या आता अमेरिका दौऱ्यावर भेटीसाठी याल का?’ असा प्रश्न विचारला. यावर मोदींनी नम्र शब्दांमध्ये सध्या तरी हे शक्य दिसत नाही असं सांगत हे आमंत्रण तुर्तात बाजूला ठेवलं. मोदींनीच यानंतर ट्रम्प यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं. यावर ट्रम्प यांनी आपण भरत दौऱ्यावर येण्यासाठी उत्सुक असल्याचं मोदींना सांगितलं.

इस्रायल आणि इराण युद्धासंदर्भातही झाली चर्चा

सध्या इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धासंदर्भातही या दोन्ही प्रमुख देशांच्या मुख्य नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या सध्य स्थितीबद्दलही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. इंडो-पॅसिफिक आणि क्वाड या दोन संघटनासंदर्भातील चर्चाही मोदी आणि ट्रम्प यांच्यात झाली.

खामेनींसाठी ट्रम्प यांची पोस्ट

ट्रम्प यांनी मोदींबरोबर चर्चा करण्याच्या काही तास आधीच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा सूचक उल्लेख करत एक पोस्ट सोशल मीडियावर केलेली. इरणाचे सर्वोच्च नेते कुठे लपलेले आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. मात्र सध्या तरी आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार नसून शहरी भागांमध्ये आणि अमेरिकी लष्करावर मिसाईल हल्ले होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आमचा संयम संपत चालला आहे. मात्र या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी सर्वांचे आभार, असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लखनऊ कोचिंग आगीत 15 ठार; इमारत अनधिकृत:2016 मध्ये पाडण्याचे दिले होते आदेश; 4 अधिकारी...

0
लखनऊमधील कोचिंगला आग लागल्याच्या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 महिला आणि 10 पुरुष आहेत. बहुतांश जण 20 ते 30...

25 ला निर्जला एकादशी, 29 ला वट पौर्णिमा:पाण्याचे महत्त्व समजावून सांगणारे एक व्रत, दुसरे...

0
जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन मोठे व्रत येतील. 25 जून, गुरुवारी निर्जला एकादशी आणि 29 जून, सोमवारी वटपौर्णिमा व्रत केले जाईल. हे दोन्ही व्रत...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता

0
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली....
spot_img

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....

उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...

0
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...

विचार सकारात्मक ठेवा, म्हातारपणाची जाणीव होणार नाही:जगप्रसिद्ध पुस्तक ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माइंड’...

0
वाढत्या वयातही मन तरुण ठेवता येते का? सकारात्मक विचार खरोखरच जीवनात फरक घडवू शकतात का? जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक असलेल्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी...

0
हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते....
error: Content is protected !!