Homeसांस्कृतिकJuly Horoscope 2025 : जुलैमध्ये शनि, गुरु, सुर्यसह अनेक ग्रहांचं गोचर, 'या'...

July Horoscope 2025 : जुलैमध्ये शनि, गुरु, सुर्यसह अनेक ग्रहांचं गोचर, ‘या’ लोकांना प्रत्येक पाऊलावर मिळणार नशिबाची साथ


जुलै कुंडली 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिना हा अतिशय खास असतो. वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हा ग्रह आणि नक्षत्र यांच्यावर अवलंबून असतो. ग्रहांची स्थिती ही ठराविक वेळेनंतर बदल असते. ग्रहांची स्थिती बदलने यामुळे मानवी जीवन आणि पृथ्वीवर त्याचा परिणाम होत असतो. अशात जुलै महिन्यात कोणते ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. तर या ग्रह स्थितीबदलामुळे जुलै महिना कोणासाठी लकी आहे, पाहूयात.

जुलैमधील ग्रह गोचर 2025

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा ग्रह 28 जुलैपर्यंत सिंह राशीत राहणार असून त्यानंतर तो कन्या राशीत गोचर करणार आहे. तर 23 जुलै रोजी मंगळ उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

ग्रहांचा राजा सूर्याबद्दल बोलायचं झालं तर, तो 6 जुलैपर्यंत मिथुन राशीत असणार आहे. त्यानंतर तो कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच, सूर्य पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्रात राहणार आहे.

तर बुद्धीचा दाता बुध हा कर्क राशीत असणार आहे. जुलै महिन्यात चार वेळा नक्षत्रात बदल होणार आहे. तो पुष्य, आश्लेषा, पुष्य आणि आश्लेषा सोबत मघ नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

संपत्तीचा कारक शुक्र 26 जुलैपर्यंत वृषभ राशीत राहणार आहे. त्यानंतर तो मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच तो कृतिका, मृगशिरा आणि रोहिणी नक्षत्रात असणार आहे.

13 जुलै रोजी शनि मीन राशीत वक्री होणार आहे. सुमारे 138 दिवस तो या स्थितीत राहणार आहे.

5 जुलै रोजी युरेनस कुंभ राशीत मागे वळणार असून 10 डिसेंबरपर्यंत सुमारे 159 दिवस मागे राहणार आहे.

जुलै महिन्यात ‘या’ राशी असणार भाग्यवान (Lucky Zodiac Sign July 2025)

वृषभ रास

जुलै महिना हा वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना करिअरच्या क्षेत्रात जबरदस्त फायदा होणार आहे. मात्र या लोकांना किरकोळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पण तुम्ही प्रयत्न केल्यास त्यातून सहज मार्ग काढू शकणार आहात. व्यवसायिकांनाही जुलैचा महिना चांगला असणार आहे. गुरु तुमच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करणार आहे. तुमच्या मेहनतीच्या बळावर तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे. मंगळ हा खर्च घराचा स्वामी असल्याने तो नफा घराकडे पाहत आहे. अशा स्थितीत, काही अडथळ्यांनंतर तुम्हाला खूप फायदे मिळणार आहे. व्यवसायातून तुम्ही भरपूर नफा कमवणार आहात. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, या महिन्यात मिश्र असणार आहे. शुक्र तुमच्या प्रेम जीवनावर आणि वैवाहिक जीवनावर अनुकूल परिणाम करणार आहे.

मिथुन रास

जुलै महिना या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला सिद्ध होणार आहे. सूर्य पहिल्या आणि दुसऱ्या घरात, मंगळ तिसऱ्या आणि चौथ्या घरात, बुध दुसऱ्या घरात असेल. यासोबतच शुक्र देखील अनुकूल परिणाम देणारा असणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनपेक्षित परिणाम दिसेल. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळणार आहे. मंगळामुळे नोकरीत तुमचे स्थान मजबूत होणार आहे. व्यवसायात तुम्हाला बनवलेल्या रणनीतीद्वारे तुम्ही भरपूर नफा मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती देखील चांगली असणार आहे. तुमच्या मेहनत आणि कर्मानुसार तुम्हाला भरपूर पैसे प्राप्त होणार आहे. तुमच्या पगारात वाढ होणार आहे. 18 जुलै नंतर आर्थिक परिस्थितीवर खूप चांगला परिणाम दिसणार आहे. या महिन्यात आरोग्यही चांगले असणार आहे. प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसणार आहेत. वैवाहिक जीवनातही आनंदच आनंद असेल.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना चांगला असणार आहे. या राशीच्या दहाव्या आणि अकराव्या घरात सूर्य असणार आहे. बाराव्या आणि पहिल्या घरात मंगळ असणार आहे. यासोबतच, बुध लाभगृहात आहे. दहाव्या घरात गुरु तर यासोबतच, शुक्र, राहू देखील चांगले परिणाम तुम्हाला देणार आहे. या राशीच्या लोकांना अनेक प्रकारे लाभ प्राप्त होणार आहे. तर काही क्षेत्रात ते कमकुवत असणार आहे. करिअरच्या क्षेत्रात, या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळणार आहे. पत्रकारिता, वकिली, शिक्षण इत्यादी क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळणार आहे. जुलैच्या मध्यात काही समस्या येण्याची शक्यता आहे पण तुम्ही खूप नफा कमवणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही चांगले परिणाम मिळणार आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप नफा मिळणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. तुम्ही धार्मिक बाबींमध्ये काही पैसे खर्च करणार आहात.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
spot_img

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...
error: Content is protected !!