Homeदेश-विदेशखारिप आणि रब्बी म्हणजे शेतकरी भारतीय शेतीबद्दलचे मनोरंजक तथ्ये म्हणजे मराठीमध्ये हे...

खारिप आणि रब्बी म्हणजे शेतकरी भारतीय शेतीबद्दलचे मनोरंजक तथ्ये म्हणजे मराठीमध्ये हे शब्द कोठे आले हे वास्तविक अर्थ माहित आहे


खरीप आणि रब्बी या शब्दाचा मूळ: कृषीप्रधान देश असलेल्या भारतात खरीप आणि रब्बी हे शेतीचे दोन हंगाम आहेत. अनेकदा शेतीचं नुकसान झालं, किंवा सरकारी अहवालामध्येही खरीप हंगामातील पीक किंवा रब्बी हंगामातील पीक असा उल्लेख आवर्जून आढळून येतो. आपल्यापैकी अनेकांना हे ही ठाऊक आहे की खरीप म्हणजे पावसाळ्यात घेतली जाणारी पिकं आणि रब्बी म्हणजे पावसाळ्यानंतर घेतली जाणारी पिकं. अर्थात आपल्यापैकी अनेकांना हे सारं चौथी-पाचवीलाच शिकवलं जातं. मात्र ‘खरीप’ आणि ‘रब्बी’ या दोन शब्दांचा सर्रास वापर केला जात असला तरी त्यांची अर्थ काय? या शब्दांचा जन्म कसा झाला? त्यांचा मूळ अर्थ काय आहे? याबद्दल आपल्यापैकी अनेकांना कल्पनाच नसणार यात शंका नाही.

कुठून आला खरीप हा शब्द?

‘खरीप’ आणि ‘रब्बी’ हे दोन शब्द तयार कसे झाले या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेल्यास यापैकी पहिला शब्द शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे. मराठी भाषेवर फारशी भाषेचा फार प्रभाव दिसून येतो. आज मराठीत वापरल्या जाणाऱ्या अनेक शब्दांचं मूळ फारशी भाषेत आहे. यामध्येच ‘खरीप’ शब्दाचाही समावेश आहे. खरीप हा मूळ शब्द फारशीमधील ‘खरीफ’ या शब्दातून आलेला आहे.

फारशीमध्ये खरीफ या शब्दाचा अर्थ पावसाळा असा होतो. म्हणूनच पावसाच्या पाण्यावर जी पिकं घेतली जातात त्याला खरीपाची पिकं म्हणतात आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर पीक पेरणीचा जो हंगाम सुरु होतो त्याला खरीपाचा हंगाम म्हणतात.

रब्बी शब्दाचा जन्म कसा झाला आणि त्याचा मूळ अर्थ काय?

आता रब्बी या शब्दाबद्दल बोलायचं झाल्यास या शब्दाची निर्मिती किंवा जन्म हा ‘रबई’ या शब्दापासून झाला आहे. हा शब्द मूळचा अरबी शब्द आहे. या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ होतो वसंत ऋतू! म्हणूनच वसंत ऋतूमध्ये घेतली जाणारी पिकं ही रब्बी हंगामातील पिकं म्हणून ओळखली जातात.

मराठीमध्येही आहेत नावं पण

हल्ली आपण ‘खरीप’ आणि ‘रब्बी’ हे शब्द वापरत असलो तरी आपल्याकडेही या पिकांच्या हंगामासाठी मराठमोळे शब्द आहेत. आपल्यापैकी कोणालाच याची कल्पना नसेल. मात्र मराठीमध्ये पिकांचे दोन हंगाम ओळखले जातात. खरीप पिकाला ‘कार्तिक फळ’ आणि रब्बी पिकाला ‘वसंत फळ’ असं म्हणतात.

तुम्हाला नक्कीच यामधून नवीन माहिती मिळाली असेल अशी आम्हाला खात्री आहे. ही माहिती तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!