Homeदेश-विदेशMahatma Gandhi's great-granddaughter, jailed for 7 years in Rs 3.22 crore fraud...

Mahatma Gandhi’s great-granddaughter, jailed for 7 years in Rs 3.22 crore fraud case | महात्मा गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत 7 वर्षांची शिक्षा! काय आहे प्रकरण जाणून घ्या


महात्मा गांधींची नातवंडे आशिष लता रामगोबिन: महात्मा गांधींच्या पणतू आशिष लता रामगोबिन यांनी असे काही केले आहे जे खूपच धक्कादायक आहे. महात्मा गांधी यांच्या पणती आशीष लता रामगोबिन यांना दक्षिण आफ्रिकेतील विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयाने ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर खोट्या आयात कागदपत्रांवरून ३.२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

काय होती केस?

दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टने हा निर्णय दिला. लता रामगोबिन (वय ५६) यांच्यावर २०१५ मध्ये व्यावसायिक एस. आर. महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप होता.  एस. आर. महाराज हे ‘न्यू आफ्रिका अलायन्स फूटवेअर डिस्ट्रीब्यूटर्स’ चे संचालक असून, त्यांनी लता यांच्यावर विश्वास ठेवून ६.२ मिलियन रँड (सुमारे ₹३.२२ कोटी) दिले होते. लता यांनी दावा केला होता की, त्यांनी भारतातून तिन्ही कंटेनर्समध्ये लिननसामग्री आयात केली असून ती दक्षिण आफ्रिकेतील खाजगी हेल्थकेअर ग्रुप ‘नेटकेअर’साठी असल्याचे सांगितले. त्या रक्कमेचा वापर कस्टम ड्युटी आणि क्लीअरन्ससाठी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा: Ahmedabad Plane Crash: ‘जरा माणुसकी दाखवा,’ हॉस्टेल रिकामं करण्यास लावल्यानंतर डॉक्टरला अश्रू अनावर, ‘हे इतकं सोपं नाही, माझी मुलगी…’

बनावट कागद सादर केले

विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी खोटे खरेदी आदेश, इनव्हॉइस, डिलिव्हरी नोट्स आणि बँक पेमेंट कन्फर्मेशनचे बनावट कागदपत्र सादर केले. त्यांच्या घराण्याच्या प्रतिष्ठेमुळे व्यावसायिक एस. आर. महाराज व्यवहार करायला तयार झाले. मात्र, काही दिवसांतच सगळे कागदपत्र  बनावट असल्याचे उघडकीस आले आणि ते साहित्यही अस्तित्वातच नव्हते.

हे ही वाचा: “लवकरात लवकर 100 शवपेट्या बनवा!…” एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी अचानक कोणाला कॉल केला?

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रार

प्रकरण उघड झाल्यावर महाराजांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासात आढळले की लता यांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र वापरून मोठा आर्थिक गुन्हा केला आहे. राष्ट्रीय अभियोजन प्राधिकरण (NPA) चे ब्रिगेडियर हंगवानी मुलाऊड्झी यांनी न्यायालयात हे सगळं प्रकरण मांडले.

लोकांची दिशाभूल केली

प्रवक्त्या नताशा कारा यांनी सांगितले की, लता यांनी ईमेल आणि बनावट बिलांच्या आधारे लोकांची दिशाभूल केली. न्यायालयाने फक्त शिक्षा सुनावलीच नाही तर तिच्या अपील करण्याच्या मागणीसुद्धा फेटाळून लावली. २०१५ मध्ये त्यांना  जामिनावर सोडण्यात आले होते. त्या काळात लता या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन व्हायोलन्स’च्या ‘पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह’ या कार्यक्रमाच्या संचालक होत्या. त्या राजकीय, सामाजिक आणि पर्यावरणविषयक कामांमध्ये कार्यरत असल्याचा दावा करत असत.

हे ही वाचा: Video: “मी 2 तासांपूर्वी त्याच फ्लाइटमध्ये होतो, त्याच वेळी…” अपघातग्रस्त झालेल्या विमानाने प्रवास केल्याचा एका व्यक्तीचा दावा

लता रामगोबिन यांचे घराणे गांधी विचारांशी जोडलेले आहे. त्यांची आई एला गांधी यांना भारत व दक्षिण आफ्रिकेने शांततेसाठी अनेक सन्मान दिले आहेत. घराण्यातील इतर सदस्य किर्ती मेनन, उमा धुपेलिया-मेस्त्री हेही सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यामुळे त्यांच्या विरुद्धचा हा गुन्हा मोठा धक्का मानला जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

22 जूनचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचा उत्पन्नाचा स्रोत पुन्हा सुरू होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात...

0
सोमवार, 22 जून रोजी मेष राशीच्या नोकरदार लोकांना टीमवर्कमुळे चांगले परिणाम मिळू शकतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना पुढे...

केप वर्देने उरुग्वेला २-२ असे बरोबरीत रोखले; बेल्जियम, इराण स्कोअरलेस

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: केप वर्देने उरुग्वेला 2-2 ने बरोबरीत रोखले; बेल्जियम, इराण स्कोअरलेस2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सोमवारी ग्रुप...

जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी‎

0
बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या...

राम मंदिर देणगी चोरीचा अहवाल चोरला जाऊ नये:अखिलेश यांनी SIT ला सतर्क केले; केजरीवाल...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीचे प्रकरण शांत होताना दिसत नाही. विशेष तपास पथक (SIT) 6 दिवसांचा तपास पूर्ण करून 20 जून (शनिवार) रोजी...
spot_img

केप वर्देने उरुग्वेला २-२ असे बरोबरीत रोखले; बेल्जियम, इराण स्कोअरलेस

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: केप वर्देने उरुग्वेला 2-2 ने बरोबरीत रोखले; बेल्जियम, इराण स्कोअरलेस2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सोमवारी ग्रुप...

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...
error: Content is protected !!