Homeदेश-विदेशAhmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या 'त्या' व्हिडीओमागील सत्य समोर; 17 वर्षाच्या...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या ‘त्या’ व्हिडीओमागील सत्य समोर; 17 वर्षाच्या आर्यनने सांगितलं ‘त्या दिवशी तो…’


अहमदाबाद विमान अपघात : गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान AI-171 कोसळलं आणि त्यात 241 जणांचा मृत्यू झालाय. या अपघातानंतर या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांना प्रश्न पडला की, अपघात होत असताना तो कॅमेऱ्यात कसा कैद झाला. त्यामुळे अपघात होत असताना तो कॅमेऱ्यात कैद होणे हा निव्वळ योगायोग आहे की तो व्हिडीओ फेक आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. अखेर या व्हिडीओमागील सत्य समोर आलं आहे. 17 वर्षीय आर्यनने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

काय आहे त्या व्हिडीओमागील सत्य?

आर्यन मेघानीनगरमध्येच राहत असून त्याने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. 17 वर्षीय आर्यन बारावीत शिकत असून लल्लंटॉपने त्याच्याशी संवाद साधला आहे. आर्यन म्हणाला की हा अपघात पाहिल्यानंतर तो खूप घाबरला आहे आणि कधीही विमानात बसणार नाही, असं त्याने सांगितलं आहे. गुरुवारी दुपारी 1:39 वाजता आर्यनने अपघाताचा व्हिडीओ बनवला. कारण त्याच्या मोबाईलमध्ये दाखवलेल्या व्हिडीओची ही वेळ आहे. आर्यन म्हणाला की त्याने हा व्हिडीओ त्याच्या वडिलांना पाठवला आहे. कदाचित त्यांनी हा व्हिडीओ दुसऱ्या कोणाला तरी पाठवला असणार आहे.

तर आर्यनच्या बहिणीने सांगितले की, माझा भाऊ पहिल्यांदाच इथे आला होता, तो गावात राहतो. जेव्हा आर्यनने पहिल्यांदाच विमान इतकं खाली पाहिले तेव्हा त्याने त्याच्या फोनवर व्हिडीओ रेकॉर्ड केला. जेणेकरून तो गावात जाऊन त्याच्या मित्रांना सांगू शकेल की मेघनीनगरमधील त्याच्या घराजवळून विमाने उडतात. आर्यनच्या बहिणीने सांगितलं की माझा भाऊ नेहमीप्रमाणे व्हिडीओ बनवत होता, पण दुर्दैवाने ते क्रॅश झाले. आर्यनने कधीही विमान इतक्या जवळून पाहिले नव्हतं.

आर्यनचे शेजारी शुभम गुप्ता म्हणाले की, अपघातग्रस्त एअर इंडियाचे विमान खूप खाली उडत होते. ते विमान सामान्यपणे उडत नव्हते. त्याची हालचाल पाहून असे वाटले की ते अपघातग्रस्त होऊ शकते. त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणाहून व्हिडीओ बनवण्यात आला आहे ते मेघानी नगरमधील ओंकार नगर कॉर्नर आहे, पण ज्या ठिकाणी विमान कोसळले ते मेघानी नगरचे आयजीपी कंपाऊंड आहे. विमान कोसळताच खूप मोठा आवाज ऐकू आला, जेव्हा आम्ही छतावर येऊन पाहिले तेव्हा आकाशात धूर होता.

अहमदाबाद पोलिसांनी या व्हिडीओबद्दल आर्यनची चौकशी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, व्हिडीओ बनवल्याबद्दल कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मोबाईल व्हिडीओचे स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओची माहिती पोलिसांना दिली. तो त्याच्या वडिलांसोबत साक्षीदार म्हणून जबाब देण्यासाठी आला होता, त्यानंतर त्याला त्याच्या वडिलांसोबत पाठवण्यात आले. अद्याप कोणालाही अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेले नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरीचा अहवाल चोरला जाऊ नये:अखिलेश यांनी SIT ला सतर्क केले; केजरीवाल...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीचे प्रकरण शांत होताना दिसत नाही. विशेष तपास पथक (SIT) 6 दिवसांचा तपास पूर्ण करून 20 जून (शनिवार) रोजी...

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही...

0
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप...

पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह

0
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन मैदानात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आरोपपत्राने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तपासानुसार, सीमेपलीकडून...

स्वामी अवधेशानंद गिरीजींचे जीवनसूत्र:जीवनात यश हवे असल्यास आपल्या क्षमता ओळखा, चांगले विचार स्वीकारा, सत्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; तुमच्या क्षमता ओळखा, चांगले विचार आत्मसात करा, सत्याच्या पाठीशी उभे राहा आणि...
spot_img

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये सुरू:पूर्ण चार्जमध्ये 154 किमी धावेल, 3.7...

0
भारतीय टू-व्हीलर उत्पादक रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळुरूमधून याची सुरुवात केली. रॉयल...
error: Content is protected !!