Homeमनोरंजनडब्ल्यूटीसी अंतिम 2025 पुन्हा ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर टेम्बा बावुमा डब्ल्यूटीसी ट्रॉफीसह अनन्य उत्सव

डब्ल्यूटीसी अंतिम 2025 पुन्हा ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर टेम्बा बावुमा डब्ल्यूटीसी ट्रॉफीसह अनन्य उत्सव


डब्ल्यूटीसी अंतिम 2025: दक्षिण आफ्रिकेने शनिवार 14 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 5 विकेटने पराभूत करून विजय मिळवला. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात मागील 27 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. 1998 नंतर दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, मात्र अखेर आज त्यांना हे यश मिळालं आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यावर कर्णधार टेम्बा बावुमाने ट्रॉफी खांद्यावर घेत हनुमानासारखी पोज देऊन खास सेलिब्रेशन केलं.

ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजय मिळवल्यावर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भावुक झाले होते. त्यांनी केवळ ही चॅम्पियनशिपचं मिळवली नाही तर त्यांच्यावर वर्षानुवर्षांपासून लागलेला चोकर्स हा टॅग सुद्धा पुसला. विजयानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी सुपूर्द केली. दक्षिण आफ्रिकेने जल्लोषात सेलिब्रेशन केलं. यावेळी टेम्बा बावुमाने हनुमानाच्या गदेप्रमाणे ट्रॉफी खांद्यांवर घेऊन खास सेलिब्रेशन केलं.

टेम्बा बावुमाचं दमदार अर्धशतक :

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचं आव्हान असताना कर्णधार टेम्बा बावुमाने दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक ठोकलं. टेम्बाने 66 धावा केल्या यादरम्यान 5 चौकार ठोकले. टेम्बा बावुमाने केलेली ही संयमी खेळी दक्षिण आफ्रिकेसाठी महत्वाची ठरली.

पाहा व्हिडीओ :

विजयासाठी दिलेलं 282 धावांचं आव्हान :

ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हटले जात होते, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याला गुडघ्यावर आणलं. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार बवूमा याने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली.  पहिल्या डावात त्यांनी ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांवर ऑल आउट केले.  मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला 207 धावांवर रोखलं ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचं आव्हान मिळालं.

विजयासाठी मिळालेलं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या  एडन मारक्रमने शतक ठोकलं. तर कर्णधार बवूमाने देखी नाबाद अर्धशतकीय कामगिरी केली. दोघांनी नाबाद राहून तिसऱ्या दिवशीचा खेळ 213 धावांवर संपवला, आता चौथ्या दिवशी विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला केवळ 69 धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी संयमी फलंदाजी करून ५ विकेटने विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:’टिन्नू टीपूसोबत बोलत होता’ असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप...

13 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या नोकरदार लोकांना प्रगतीची शक्यता, कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा...

0
13 जुलै, सोमवार रोजी सिंह राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या कामामुळे पदोन्नती मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे....

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...
spot_img

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
error: Content is protected !!