Homeदेश-विदेशड्रिमलायनर की डेथलायनर? बोईंग कंपनीच्या ड्रीमलाईनर विमानाबाबत राज ठाकरेंचा सरकारला सवाल

ड्रिमलायनर की डेथलायनर? बोईंग कंपनीच्या ड्रीमलाईनर विमानाबाबत राज ठाकरेंचा सरकारला सवाल


मुंबई : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बोईंग कंपनीचं ड्रिमलायनर डेथलायनर बनलंय का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय.  कारण जगभरात बोईंगच्या विमानांचे 6 हजार अपघात झाले आहेत. यामध्ये 9 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान बोईंग कंपनीचं आहे. या अपघातानंतर बोईंग विमानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अहमदाबाद अपघाताआधी सरकारी आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत 6 हजार बोईंग विमानांचे अपघात झाले आहेत. यातील 415 अपघात अतिशय भीषण होते. यात जगभरात 9 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय.

बोईंग की उडता बॉम्ब?

जगभरात बोईंगचे सुमारे 6 हजार अपघात झाले असून यात जगभरात 9 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय. 4 हजाराहून अधिक बोईंग 737-800 मॉडेलची विमानं वापरात असून आशिया, युरोप, उत्तर अमेरिकेत विमानांचा वापर केला जातो.

बोईंगमधील MCAS मुळे वारंवार घात?

जगभरात सध्याच्या घडीला 4 हजाराहून अधिक बोईंग 737-800 मॉडेलची विमानं वापरत आहेत. सध्या आशिया, युरोप, उत्तर अमेरिकेत या विमानांचा सर्वाधिक वापर होतो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात या विमानांचा अपघात होत असताना देखील दुर्लक्ष का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

डायमेलेनरचा डेथलेनर?

राज ठाकरेंनी देखील अपघातग्रस्त बोईंग विमानासंदर्भात काही सवाल केले आहेत. बोईंग ‘ड्रीमलाईनर’ विमानाबद्दल अनेक तक्रारी आलेल्या असताना देखील कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

राज ठाकरेंचे ‘ड्रीमलाईनर’वर सवाल :

बोईंगच्या ‘ड्रीमलाईनर’ विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या.  2013 ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली.  विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्यामुळे 2020 ते 2023 या काळात अनेकदा विमानांच उड्डाण थांबवलं. जानेवारी 2013ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने उड्डाण खंडित केलं. 2013ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं.

ड्रीमलाईनरची सेवा 2020 ते 2023 च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित असं असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40 हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली. सगळ्याला सरकारने परवानगी का दिली? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला? मी जे सगळं मांडलं आहे त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये छापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्रीपण केली आहे, त्याची युट्युब लिंक पण सोबत दिली आहे. बोईंग विमानांचा सातत्यानं अपघात होत असल्यानं बोईंग 737 मॅक्सची तपासणी करण्यात आली. त्यात MCAS संबंधित समस्या आढळून आली. त्यामुळे याच MCAS मुळे वारंवार अपघात होतायत का? असा सवाल भारतातूनच नव्हे तर जगभरातून उपस्थित करण्यात येतोय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरीचा अहवाल चोरला जाऊ नये:अखिलेश यांनी SIT ला सतर्क केले; केजरीवाल...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीचे प्रकरण शांत होताना दिसत नाही. विशेष तपास पथक (SIT) 6 दिवसांचा तपास पूर्ण करून 20 जून (शनिवार) रोजी...

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही...

0
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप...

पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह

0
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन मैदानात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आरोपपत्राने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तपासानुसार, सीमेपलीकडून...

स्वामी अवधेशानंद गिरीजींचे जीवनसूत्र:जीवनात यश हवे असल्यास आपल्या क्षमता ओळखा, चांगले विचार स्वीकारा, सत्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; तुमच्या क्षमता ओळखा, चांगले विचार आत्मसात करा, सत्याच्या पाठीशी उभे राहा आणि...
spot_img

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये सुरू:पूर्ण चार्जमध्ये 154 किमी धावेल, 3.7...

0
भारतीय टू-व्हीलर उत्पादक रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळुरूमधून याची सुरुवात केली. रॉयल...
error: Content is protected !!