Homeदेश-विदेशइराण किंवा इस्त्राईल युद्ध अद्यतने ज्यांच्याकडून भारत निर्यात करतो बहुतेक वस्तू आयात...

इराण किंवा इस्त्राईल युद्ध अद्यतने ज्यांच्याकडून भारत निर्यात करतो बहुतेक वस्तू आयात करतो


इराण इस्त्राईल तणाव: तिथं रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव कमी होत नसतानाच इथं इराण आणि इस्रायलमध्येसुद्धा वादाची ठिणकी पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही देशांमधील तणावाचा थेट परिणाम जागतिक स्तरावरील व्यापारावर होत असून भारतीय अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे.

इराण जगभरातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल उत्पादक देश असून, मध्य पूर्वेमध्ये हा देश तेल उत्पादनात अग्रस्थानी आहे. 2023 च्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास इराणमध्ये 2.4 बिलियन बॅरल क्रूड ऑईलचं उत्पादन झाल्याची माहिती मिळते. एकूण तेल उत्पादनापैकी साधारण अर्ध्या उत्पादनाची विक्री इराण इतर देशांना करत असून चीन त्यांचा सर्वात मोठा खरेदीदार असल्याचं सांगण्यात येतं.

तेल खरेदीदारांमध्ये भारताचाही समावेश असून फक्त तेलच नव्हे, तर भारतात इराणकडून इतरही सामानाची आयात केली जाते आणि त्याच व्यापारावरही आता या तणावाचं सावट स्पष्टपणे दिसत आहे. भारतात इराणमधून सुकामेवा, रसायनं, काचेची भांडी आणि तत्सम गोष्टींची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. तर, भारताकडून इराणमध्ये बासमती तांदुळ निर्यात केला जातो.

2014 ते 2015 मध्ये भारताकडून बासमती तांदुळ आयात करणाऱ्या देशांमध्ये इराण दुसऱ्या क्रमांकावरील देश ठरला. तर, 2022-23 च्या आर्थिक वर्षात इराणनं भारताकडून  998,879 मेट्रिक टन इतका तांदूळ आयात केला होता. याशिवाय इराण भारताकडून चहा, कॉफी आणि साखरेचीही आयात करतो.

इराण भारताकडून दरवर्षी 4 कोटी किलो चहा, 19 टक्के बासमती तांदुळ आयात करतो आणि हा संपूर्ण व्यवहार साधारण 60 कोटी डॉलरच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, सध्याची तणावाची परिस्थिती पाहता आयात आणि निर्यातीच्या या व्यवहारावर सावट येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इस्रायलसोबतही भारताचा मोठा व्यापार…

फक्त इराणच नव्हे, तर इस्रायलसुद्धा भारताशी व्यापाराच्या या विश्वात सक्रिय असून, 2023 मध्ये भारतानं इस्रायलसोबत 89000 कोटींचा व्यवहार केला होता. भारताकडून इस्रायलला मौल्यवान हिरे, दागदागिने, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग सामग्री देण्यात आली होती, तर इस्रायलकडून भारतानं लष्करी सामग्री आयात केली होती.

दोन्ही देशांसोबत भारताचा असणारा व्यवहार आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्ट्रीट्यूटच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दोन्ही देशांसोबत भारताचा आयात आणि निर्यातीचा व्यवहार पाहता सध्या उद्भवलेली तणावाची परिस्थिती पाहता या आर्थिक व्यवहारांवर कमीजास्त प्रमाणात थेट परिणाम दिसून येणार ही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सामान्य नागरिकांच्या खिशावर या आंतरराष्ट्रीय तणावग्रस्त परिस्थितीचा नेमका कसा परिणाम होईल यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर आणि तत्सम गोष्टींच्या दरांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरीचा अहवाल चोरला जाऊ नये:अखिलेश यांनी SIT ला सतर्क केले; केजरीवाल...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीचे प्रकरण शांत होताना दिसत नाही. विशेष तपास पथक (SIT) 6 दिवसांचा तपास पूर्ण करून 20 जून (शनिवार) रोजी...

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही...

0
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप...

पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह

0
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन मैदानात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आरोपपत्राने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तपासानुसार, सीमेपलीकडून...

स्वामी अवधेशानंद गिरीजींचे जीवनसूत्र:जीवनात यश हवे असल्यास आपल्या क्षमता ओळखा, चांगले विचार स्वीकारा, सत्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; तुमच्या क्षमता ओळखा, चांगले विचार आत्मसात करा, सत्याच्या पाठीशी उभे राहा आणि...
spot_img

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये सुरू:पूर्ण चार्जमध्ये 154 किमी धावेल, 3.7...

0
भारतीय टू-व्हीलर उत्पादक रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळुरूमधून याची सुरुवात केली. रॉयल...
error: Content is protected !!