Homeदेश-विदेशमेटाव्हर्स अभियंता आता 1 कोटींपेक्षा जास्त कमाई करीत बेघर अन्न वितरित

मेटाव्हर्स अभियंता आता 1 कोटींपेक्षा जास्त कमाई करीत बेघर अन्न वितरित


बेघर माणसाला एक कोटी पेक्षा जास्त कमाई: कोणाचं नशीब कसं बदलू शकतं सांगता येत नाही. अर्थात अशा वाक्याने सुरु होणाऱ्या अनेक सकारात्मक बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या असतील. मात्र आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचा या वाक्याला साजेसा उलटा प्रवास झाला आहे. म्हणजेच महिन्याला लाखो रुपये कमवणाऱ्या या व्यक्तीवर आता अचानक छोटी-मोठी काम करुन दोन वेळेच्या जेवणाची सोय करण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भविष्यात हे तुमच्यासोबतही होऊ शकतं असा इशारा या व्यक्तीने दिलाय. त्याच्यासोबत नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात…

महिन्याला 10 लाख रुपये पगार अन् आता…

एकेकाळी फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या मेटाव्हर्स कंपनीमध्ये महिन्याला 10 लाख रुपयांपेक्षा अधिक पगार असलेल्या व्यक्तीचं नाव आहे शॉन! शॉनचा वार्षिक पगार दीड लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार वर्षाला 1 कोटी 28 लाख रुपये इतका होता. सॉफ्टवेअर इंजनिअर असलेला शॉन आज 42 वर्षांचा असून सध्या तो एका ट्रकमध्येच वास्तव्यास आहे. तो सध्या जगण्यासाठी फूड डिलेव्हरी बॉय आणि ई-बेवर वस्तू विकण्याची कामं करतो. शॉनला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव असूनही त्याला एप्रिल 2024 मध्ये अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं.

800 हून अधिक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज

तेव्हापासून म्हणजेच मागील 15 महिन्यांपासून शॉन नोकरीच्या शोधात आहे. त्याने या 15 महिन्यांमध्ये 800 हून अधिक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला असून त्याला मुलाखतीसाठी 10 हूनही कमी कॉल आले आहेत. अनेक ठिकाणी एआय रोबोट्सच्या माध्यमातून छाणणी करताना त्याला ऑफर न देताच त्याचा अर्ज वगळला जातोय.

नक्की वाचा >> दिवसाचा पगार 22 लाख रुपये, 23 कोटी TVP.. भारतातील सर्वात श्रीमंत कर्मचारी; ही व्यक्ती आहे कोण? काय काम करते?

वाढत्या बेरोजगारीसाठी एआय कारणीभूत

शॉन त्याच्यावर ही वेळ येण्यासाठी जनरेटिव्ह एआयची अल्पावधीत झालेली वाढ कारणीभूत असल्याचं सांगतो. एआय तंत्रज्ञान आयटी क्षेत्रामध्ये एआय मानवी प्रतिभेला पूर्णपणे रिप्लेस करत असल्याचं शॉनचं मत आहे. स्वतःला ‘एआय मॅक्सिमलिस्ट’ म्हणवणारा शॉन तत्वतः टेक्नोलॉजिचा वापर झाला पाहिजे अशा मताचा आहे. मात्र सध्या ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वापरलं जातंय त्यावर त्याचा आक्षेप आहे.  एआयचा वापर लोकांच्या क्षमता वाढवण्याऐवजी त्यांच्या जागी पर्याय शोधण्यासाठी केला जात आहे. “एआयमुळे निर्माण झालेली नोकऱ्यांमधील सध्याची शांतता ही अधिक खोलवर परिणाम करणारी आणि भयानक आहे,” असं शॉनने ‘फॉर्च्यून’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. एकेकाळी नावीन्यता आणि वेगवेगळ्या संधींसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रातील वाढत्या बेरोजगारीसाठी एआयचा वाढता प्रभाव कारणीभूत असल्याचं शॉनचं म्हणणं आहे.

कंपन्यांनी लोकांना कामावरुन काढण्याऐवजी…

मेटाव्हर्ससारख्या ट्रेंडिंग तंत्रज्ञानावर आता एआयचा प्रभाव वाढताना दिसतोय, असं निरिक्षण शॉनने नोंदवलं आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर कायम ठेवण्याऐवजी खर्च कमी करण्याला प्राधान्य देत आहेत. शॉनचा असा विश्वास आहे की कॉर्पोरेट धोरणांमध्ये दूरदृष्टीचा आभाव आहे. एआयच्या माध्यमातून आहे त्या कर्मचारी संख्येत नवीन उपक्रम राबवण्याऐवजी लोकांना नोकऱ्यांवरुन काढून टाकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, असं शॉन सांगतो. “आज मी ज्या ठिकाणी, उद्या तिथे बरेच जण असतील,” अशा इशाराही शॉनने दिला आहे.

कमाईचे नवे मार्ग शोधतोय तो…

मागील 15 महिन्यांमध्ये अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत असलेला शॉन उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधत आहे. शॉन सध्या टेक्निकल सर्टिफिकेशन अथवा कमर्शिअल ड्रायव्हिंग लायसन्ससारख्या माध्यमातून ठराविक रक्कम महिन्याच्या शेवटी हाती पडेल अशी नोकरी शोधत आहे. आपल्याकडे असलेलं कौशल्य अधिक वाढवण्यासाठी किंवा ते पॉलिश करण्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण घेण्यासाठी त्याला सध्या पैशांची कमतरता भासत आहे.

अनेकांबरोबर हे घडू शकतं

शॉनबरोबर जे काही घडलं आहे ती त्याची एकट्याची गोष्ट असली तरी भविष्याच्या दृष्टीने इशारा देणारी आहे. जबाबदारपणे कामाच्या ठिकाणी केलेलं जबाबदारीचं नियोजन आणि मानवाला केंद्रस्थानी ठेऊन संतुलित विकासाचा विचार न करता एआयवर भर दिल्यास निर्माण होणारं असंतुलन हे बेरोजगारीची समस्या अजून गंभीर करु शकतं, हे उदाहरणातून स्पष्ट होत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!