Homeमनोरंजनमिथुन जितेंद्र किंवा बोनी कपूर नाही तर श्रीदेवीने या अभिनेत्यासाठी 7 दिवस...

मिथुन जितेंद्र किंवा बोनी कपूर नाही तर श्रीदेवीने या अभिनेत्यासाठी 7 दिवस उपवास केला


श्रीदेवी यांनी या अभिनेत्यासाठी उपवास केला: बॉलिवूडच्या दिग्गज आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांचा अभिनय त्यांची सुंदरता आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते. पण आज आपण अशा एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्यासाठी अभिनेत्री श्रीदेवी यांनी एकदा 7 दिवसांचा उपवासदेखील केला होता. एवढंच नाही, तर त्या दररोज देवळात जाऊन त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होत्या.

श्रीदेवी आता आपल्यात नाहीत, पण त्यांचे चित्रपट, त्यांची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. त्यांनी निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांचं वैवाहिक आयुष्यही आनंदी होतं. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की श्रीदेवी यांचं नाव एकेकाळी एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं.

आपण बोलतोय सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल. रिपोर्ट्सनुसार, एकदा रजनीकांत यांची तब्येत खूपच खराब झाली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हे कळताच श्रीदेवी यांनी साईबाबांकडे मन्नत मागितली आणि सात दिवसांचा उपवास केला.

इतकंच नाही तर त्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही गेल्या होत्या. त्यांच्यासाठी श्रीदेवी यांनी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेचा परिणाम म्हणूनच की काय, पण रजनीकांत लवकर बरे झाले. असं म्हटलं जातं की रजनीकांत आणि श्रीदेवी यांचं नातं खूप खास होतं. रजनीकांत त्यांचा खूप आदर करत आणि काळजीही घेत होते.

श्रीदेवी आणि रजनीकांत यांनी एकत्र 19 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या जवळिकीबद्दल बरीच चर्चा होती. इतकी की रजनीकांत यांनी एकदा लग्नाची विचारणा करण्याचा निर्णय घेतला होता. पण अशी एक घटना घडली आणि तो विषय तिथेच थांबला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. बालाचंदर यांनी एकदा सांगितलं होतं की, रजनीकांत श्रीदेवीं यांचा हात मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. पण जसेच ते घरात शिरले, लाईट गेली. हे पाहून रजनीकांत यांनी ते अपशकुन मानलं आणि तिथून निघून गेले.

हेही वाचा : समांथानं मिटवली नागा चैतन्यची अखेरची निशाणी, दिग्दर्शकाला डेटिंग ठरलं कारण? चाहते म्हणाले…

त्यानंतर पुन्हा कधीही लग्नाची गोष्ट पुढे आली नाही. त्यानंतर 1996 मध्ये श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं. तेव्हा बोनी कपूर आधीच विवाहित होते, पण तरीही त्यांचं आणि श्रीदेवीचं प्रेम जडलं आणि त्यातून एक नवं नातं निर्माण झालं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पराग अग्रवाल यांनी समांतर वेब सिस्टिम सुरू केली; 19 हजार कोटी कमावतो

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग...

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!