प्रीटी झिंटा भावनिक पोस्ट पंजाब राजे सामायिक करते: IPL 2025 च्या अंतिम सामन्यात IPL च्या इतिहासात असं काही घडलं ज्याची सगळेच प्रतीक्षा करत होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाब किंग्सला पराभूत करत 18 वर्षांनंतर पहिल्यांदा विजेत्याची ट्रॉफी उचलली. पण पंजाब किंग्सच्या या पराभवानंतर संघाची सहमालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटानं एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या संघाचा, स्टाफचा आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले. इतकंच नाही तर तिने वचन दिलं की पुढच्या वेळेस तिची टीम ट्रॉफीसाठी नक्कीच परतेल.
प्रीतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर टीमचा एक फोटो शेअर करत लिहिलं, ‘जसं आपण अपेक्षित केलं तसा शेवट झाला नाही, पण हा प्रवास खूपच सुंदर आणि संस्मरणीय होता. हा सीझन उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि मनोरंजक होता. मला आमच्या तरुण टीमचा अभिमान आहे. आमच्या ‘शेरांनी’ ज्या जिद्दीनं आणि धाडसानं खेळी खेळली, ते खरंच कौतुकास्पद आहे.’
आम्हाला पाहिजे त्या मार्गाने हे संपले नाही परंतु…. प्रवास नेत्रदीपक होता! हे रोमांचक, मनोरंजक होते आणि ते प्रेरणादायक होते. मला लढा आणि आमचा तरुण संघ आवडला, आमच्या शेर्सने संपूर्ण स्पर्धेत दाखवले. मला आमचा कर्णधार, समोरचा सरपंच आघाडी आवडली आणि…… pic.twitter.com/kutrs908as
– प्रीटी जी झिंटा (@रीलप्रीटीझिन्टा) 6 जून, 2025
तिनं टीमच्या कॅप्टनला प्रेमानं ‘सरपंच’ असं म्हणत त्याच्या नेतृत्वाची स्तुती केली आणि खास करून भारतीय अनकॅप्ड खेळाडूंचा उल्लेख केला, ज्यांनी संपूर्ण सीझनमध्ये जबरदस्त कामगिरी केली.
प्रीतीनं या सीझनमधल्या अडचणीही सांगितल्या, ‘जसं की खेळाडूंच्या दुखापती, आंतरराष्ट्रीय ड्युटीमुळे होणारे बदल, अचानक आलेला ब्रेक, होम ग्राउंड बदलणं आणि काही सामन्यांमध्ये स्टेडियम रिकामं ठेवणं. तरीही, या सगळ्या अडथळ्यांवर मात करत, आम्ही एक दशकानंतर पॉइंट्स टेबलमध्ये टॉपला पोहोचलो. अंतिम फेरी गाठणं देखील आमच्यासाठी एक मोठं यश आहे,’ असं ती म्हणाली.
हेही वाचा : हॉलिवूड चित्रपटात एकत्र दिसणार सलमान खान आणि संजय दत्त; 7 Dogs चा Teaser प्रदर्शित
शेवटी प्रीतीनं PBKSच्या चाहत्यांना ‘Sher Squad’ म्हणत मनापासून धन्यवाद दिला आणि लिहिलं, ‘आज आम्ही जे काही आहोत, जिथे आहोत, ते सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच शक्य झालं. पुढच्या वेळेस आम्ही अपूर्ण काम पूर्ण करायला परत येऊ. तोवर सुरक्षित राहा आणि माझं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचत राहू द्या.’ प्रीतीची ही भावनिक पोस्ट फक्त चाहत्यांचाच नाही, तर टीमच्याही मनाला भिडली आहे. अनेकांनी तिनं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत तिची आणि तिच्या टीमचं कौतूक केलं आहे.




























