Homeमनोरंजनमॅक्सवेल पाठोपाठ 'या' दिग्गज क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

मॅक्सवेल पाठोपाठ ‘या’ दिग्गज क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती


हेनरिक क्लासेन: 2  जून रोजी ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता क्रिकेट विश्वातील अजून एका दिग्गज क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेटकिपर फलंदाज हेनरिक क्लासेनने वयाच्या 33  व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.

सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून हेनरिक क्लासेनने त्याच्या निवृत्तीबाबत फॅन्सना सांगितले. हेनरिक क्लासेनने काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना शतक ठोकलं होतं, मात्र लीग स्टेजमधील अनेक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने ते प्लेआफसाठी क्वालिफाय होऊ शकले नाहीत.

हेनरिक क्लासेनने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करून आपल्याला देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मोठा सन्मान मिळाला याबद्दल आभार मानले. देशासाठी क्रिकेट खेळणं हे आपलं लहानपणीपासूनच स्वप्न होतं असं हेनरिक क्लासेन म्हणाला. हेनरिक क्लासेन त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला की, ‘ हा माझ्यासाठी एक दुःखद दिवस आहे कारण मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. मला या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागला. हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता, पण एक असा निर्णय आहे ज्याने माझ्या मनाला शांतता मिळाली’.

हेही वाचा : Glenn Maxwell retirement: ग्लेन मॅक्सवेलने घेतली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती, कारण…

क्लासेनने पोस्टच्या शेवटी म्हटले की, ‘प्रोटियाज बॅजला आपल्या छातीवर लावून खेळणं माझ्या करिअरमधील खूप मोठा सन्मान होता आणि नेहमी राहील. मी आता माझ्या कूटूंबासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी उत्सुक आहे. मी त्या सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो ज्यांनी माझ्या करिअरमध्ये मला आणि माझ्या सहकार्यांना समर्थन दिलं’.

हेनरिक क्लासेंच कारकीर्द:

हेनरिक क्लासेन हा एक आक्रमक फलंदाज आणि विकेटकिपर असून त्याने साऊथ आफ्रिकेसाठी तीनही फॉरमॅट खेळले आहेत. त्याने एकूण 102 सामने खेळले असून यात 4 टेस्ट, 60 वनडे आणि 58 टी20 सामन्यांचा समावेश आहे. तसेच वनडेमध्ये त्याने 4 शतक सुद्धा लगावली आहेत. 2018 मध्ये  पदार्पण केल्यावर त्याने 3145 धावा केल्या.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!