Homeदेश-विदेशपाकिस्तान पंतप्रधान शेहबाझ शरीफ स्कॅनिंग अभिनेता मावरा होकेन व्हिडिओ व्हायरल आहे

पाकिस्तान पंतप्रधान शेहबाझ शरीफ स्कॅनिंग अभिनेता मावरा होकेन व्हिडिओ व्हायरल आहे


पाकिस्तान पंतप्रधान शेहबाझ शरीफ व्हिडिओ: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सध्या त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध मागील महिन्याभरापासून कमालीचे तणावपूर्ण असल्याने शाहबाज शरीफ यांचं नाव बरंच चर्चेत आहे. देशातील युद्धजन्य परिस्थितीदरम्यान 73 वर्षीय शाहबाज शरीफ यांनी केलेली अनेक विधानं पाकिस्तानची पोलखोल करणारी ठरली आहेत. भारताने 7 मे रोजी मध्यरात्रीनंतर हवाई हल्ला केल्याची माहिती शरीफ यांनीच आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिल्यानंतर पुढील काही आठवड्यांमध्ये त्यांनी केलेल्या हास्यास्पद आणि स्वत:च्याच देशाची पोलखोल करणारी विधानं इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली. असं असतानाच आता त्यांचा एक नको तो व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शाहबाज शरीफ हे फार शरीफ नाहीत असा टोला लगावला आहे.

कधीचा आहे हा व्हिडीओ?

शाहबाज शरीफ यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा 2023 सालातील आहे. या व्हिडीओमध्ये शाहबाज शरीफ हे एका पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सदर कार्यक्रम हा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पंजाबच्या राज्यपाल भवनामध्ये पार पडला होता. या व्हिडीओत शाहबाज शरीफ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जात असल्याचं दिसत आहे. मात्र याच दरम्यान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला न शोभणारी एक गोष्ट केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

व्हिडीओत नेमकं आहे तरी काय?

हा जुना व्हिडीओ आता पाकिस्तानमधील ‘यू न्यूज टीव्ही’ने त्यांच्या युट्यूब चॅनेलवरही पोस्ट केला आहे. या व्हिडीओला संबंधित चॅनेलने, “शाहबाज शरीफ पुरस्कार प्रदान करताना मावरा होकेनला निरखून पाहत असताना… वा व्हिडीओ व्हायरल झालाय,” अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल मावरा होकेन हिला शाहबाज शरीफ पुरस्कार प्रदान करताना दिसत आहेत. अभिनेत्री मंचावर येऊन शाहबाज शरीफ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारते. त्यानंतर पुढे निघून जाते. मात्र ही अभिनेत्री पाठ वळवून पुढे निघून जात असतानाच शाहबाज शरीफ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निरखून पाहताना दिसत आहेत. “शरीफ हे फारसे शरीफ नाहीत” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ…

बॉलिवूडमध्येही या अभिनेत्रीनं केलंय काम

अशाप्रकारे नामांकित व्यक्तींनी अभिनेत्रींकडे चुकीच्या अर्थाने पाहण्याचे प्रकार अनेकदा कॅमेरात कैद झाले आहेत. आता शाहबाज शरीफ यांचा हा व्हिडीओ अशाच अर्थाने व्हायरल होतोय ज्यामध्ये कशाप्रकारे पुरुष महिलांकडे त्यांना ऑब्जेक्टीफाय केल्याप्रमाणे पाहतात हे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मावरा होकेनने ‘समन तेरी कसम’ (2016) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकत्याच भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ‘समन तेरी कसम’मध्ये मावरासोबत झळकलेला भारतीय अभिनेता हर्षवर्धन राणे याने पुन्हा तिच्यासोबत आपण या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्याच इच्छूक नसल्याचं जाहीर केलं आहे.

दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेत शाहबाज शरीफ

शाहबाज शरीफ हे वयाच्या 72 व्या वर्षी 2024 साली मार्च महिन्यात दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून ते पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षाच्या आघाडीचं सरकार चालवतात. 336 सदस्य असलेल्या पाकिस्तानी संसदेच्या सभागृहात शरीफ नेतृत्व करत असलेल्या आघाडी सरकारला 201 सदस्यांचा पाठिंबा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!