आयपीएल 2025: आयपीएल 2025 मध्ये क्वालिफायर 2 सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला असून आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आता पंजाब किंग्स 3 जून रोजी आरसीबी विरुद्ध फायनल सामना खेळेल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर 2 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी झालेला टॉस पंजाब किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळाले. यावेळी मुंबई इंडियन्सने 6 विकेट गमावून 203 धावा केल्या होत्या. यात मुंबईकडून सर्वाधिक धावा या तिलक वर्मा (44) आणि सूर्यकुमार यादवने (44) केल्या. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 204 धावांचे आव्हान दिले.
पंजाब किंग्सकडून विजयाचं आव्हान पूर्ण करताना कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 87 धावांची कामगिरी केली. त्यासोबतच नेहाला वढेराने 48, जॉश इंग्लिशने 38, तर प्रियांश आर्याने 20 धावा केल्या. पंजाब किंग्सने विजयाचं आव्हान 5 विकेट आणि 1 ओव्हर राखून पूर्ण केलं. पंजाब किंग्सने आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा फायनलमध्ये एंट्री घेतली असून ते आता आरसीबी विरुद्ध फायनल सामना खेळणार आहेत. 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 चा फायनल सामना पार पडेल.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11:
रोहित शर्मा.
पंजाब किंग्सची खेळत आहे 11:
प्रियणश आर्य, जोश इंग्लिश (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्नाधर), नेहल वधेरा, मार्कस स्टोनेनिस, शशांकसिंग, अजमतुल्ला ओमरजहाई, किल जामसन, विजय कुमार विशाका, अरशदीप सिंह,































