Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात पुन्हा भोंग्यांचं राजकारण, अबू आझमी विरुद्ध मनसे संघर्ष पेटणार?

महाराष्ट्रात पुन्हा भोंग्यांचं राजकारण, अबू आझमी विरुद्ध मनसे संघर्ष पेटणार?


एमएनएस वि अबू आझमी: मशिदींवरील भोंग्यांवरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.मशिदींवरच्या भोंग्यांमुळे जाणीवपूर्वक मुस्लीमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप अबू आझमींनी केलाय.त्याला मनसेनं प्रत्युत्तर दिलं.

मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात राज ठाकरेंनी जाहीर भूमिका घेतली होती.भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करा, असं आवाहनही राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं होतं.आता मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.सपाचे आमदार अबू आझमी यांनी केलेलं एक वक्तव्य याला कारणीभूत ठरलंय.

अबू आझमींनी डिवचलं

उत्तर प्रदेशच्या मंदिरातही जोरजोरात कीर्तन वाजत असतात, त्यावर कधीच कुणी आक्षेप घेत नाही, असं आझमींनी म्हटलंय.भोंग्यांच्या मुद्यावरुन केवळ मुस्लिमांना त्रास दिला जातो, असा आरोप आझमी यांनी केलाय.व्होट बँकेसाठी भोंग्यांचं राजकारण सुरू असून पोलिसांनी डेसिबल तपासावं असं आवाहनही आझमींनी केलंय.

मनसेचं प्रत्युत्तर

मशिदीवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी जाहीर भूमिका घेतली होती.त्यानंतर अनेक ठिकाणी भोंगे उतरवले गेले.आता अबू आझमींनी मशिदींवरच्या भोंग्यांमुळे फक्त मुस्लीमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय.याला आता मनसेनं प्रत्युत्तर दिलंय.जे चुकीचं आहे त्यालाच राज ठाकरे आणि मनसेनं विरोध केलाय.आम्ही राजकारण करत नाही, असा पलटवार मनसेनं केलाय.

अबू आझमी विरुद्ध मनसे संघर्ष

राज ठाकरेंनी जाहीर सभेतून मशिदीवरील भोंगे हटवले गेले पाहिजेत अशी आक्रमक भूमिका घेतली होती.माझ्या हातात सत्ता द्या, 48 तासात मशिदीवरचे भोंगे हटवून दाखवतो, असं विधानही विधानसभा निवडणुकीच्या वरळीच्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी केलं होतं.आता अबू आझमींनी भोंग्यांच्या मुद्याला हात घालून मनसेला डिवचलंय. येत्या काळात याच मुद्यावरून अबू आझमी विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...

0
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...
spot_img

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!