Homeदेश-विदेशइंजिनीअर निघाला गद्दार, फेसबुकवरुन ओळख; मुलीच्या नादात 14 युद्धनौकांची गुप्त माहिती दिली...

इंजिनीअर निघाला गद्दार, फेसबुकवरुन ओळख; मुलीच्या नादात 14 युद्धनौकांची गुप्त माहिती दिली पाकिस्तानला


महाराष्ट्र एटीएस: भारत आणि पाकिस्तानात सध्या तणावाचे वातावरण आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला दणका दिल्यानंतर भारतातून पाकिस्तानी हेर सतत पकडले जातायत. याची सुरुवात ज्योती मल्होत्रापासून झाली आणि आतापर्यंत अनेक हेर एजन्सींच्या तावडीत सापडलेयत. अलीकडेच महाराष्ट्र एटीएसने त्याच आरोपाखाली ज्युनिअर संरक्षण कंत्राटदार रवींद्र मुरलीधर वर्माला अटक केलीय. 27 वर्षीय रवींद्र मुरलीधरवर पाकिस्तानशी संबंधित एजंटांना भारतीय नौदलाच्या जहाजे आणि पाणबुड्यांशी संबंधित गुप्त माहिती दिल्याचा आरोप आहे. यामध्ये 14 युद्धनौकांची माहिती समाविष्ट आहे. त्यापैकी 5 माहिती पूर्णपणे बरोबर आणि गोपनीय असल्याचे आढळून आलंय.

तिथे प्रवेश कसा मिळाला?

मुरलीधर करसानी डिफेन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करायचा. ही कंपनी इंडियन नेव्हल डॉकयार्ड, माझगाव डॉक आणि कोस्ट गार्ड सारख्या प्रमुख संरक्षण संस्थांची दुरुस्ती करते. इलेक्ट्रिकल विभागात असल्याने त्याला गुप्त नौदल क्षेत्रात जाण्याची परवानगी होती. याचा फायदा घेत वर्मा पाकिस्तानला गुप्त माहिती देऊ लागला. इकॉनॉमिक्स टाईम्समने यासंदर्भात वृत्त दिलंय.

फेसबुकवरून हेरगिरी सुरू

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 2024 मध्ये मुरलीधरला ‘पायल शर्मा’ आणि ‘इशप्रीत’ नावाच्या बनावट फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्या होत्या. हे अकाउंट पाकिस्तानी एजंट बनावट नावांनी चालवत असल्याचे सांगण्यात आले. पायल शर्मा आणि इशप्रीत यांनी स्वतःची ओळख भारतीय नौदलाशी संबंधित संशोधक म्हणून करून दिली. काही आठवड्यांत या लोकांमधील संभाषण भावनिक पातळीवर पोहोचले होते.

फोन, स्केचेस, डायग्रामद्वारे पाठवले मेसेज

रविंद्र वर्मा भावनेच्या आहारी जात आणि पैशाच्या बदल्यात माहिती शेअर करू लागला. रविंद्र कोणाला आणि कोणती माहिती देतोय हे त्याला माहित होते. नौदल क्षेत्रात मोबाईल फोन बाळगण्यास मनाई असते पण वर्माने नियम तोडले आणि माहिती लक्षात ठेवली आणि नंतर ती स्केचेस, आकृत्या किंवा ऑडिओ संदेशांच्या स्वरूपात पाकिस्तानला पाठवल्याचे वृत्त समोर येत आहे.  ‘माझा मुलगा एका महिलेच्या जाळ्यात अडकला होता आणि त्याला ब्लॅकमेल करण्यात आले होते, असे रविंद्रच्या आईने सांगितले.

नौदलाच्या डायरीचे फोटोही पाठवले

‘मी आज सर्व जहाजे पाहिली आहेत. मी डायरीमध्ये सर्व काही लिहिले आहे आणि ते तुम्हाला पाठवले आहे.’, असे  11 मार्च 2025 रोजीच्या एका ऑडिओमध्ये मुरलीधर म्हणताना ऐकू येतंय.  इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी त्यांनी 14 नौदल जहाजांची माहिती असलेल्या डायरीचे फोटोही पाठवले. त्यापैकी 5 जहाजांची माहिती गोपनीय होती. या संदर्भात अजूनही तपास सुरू आहे. यामध्ये कोणते मोठे हेरगिरी नेटवर्क सामील आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!