Homeमहाराष्ट्रवैष्णवीने आत्महत्येआधी निलेश चव्हाणसोबत संवाद साधलेला? कोर्टात वकिलांनी सगळंच सांगितले, 'नातेवाईक नसताना...'

वैष्णवीने आत्महत्येआधी निलेश चव्हाणसोबत संवाद साधलेला? कोर्टात वकिलांनी सगळंच सांगितले, ‘नातेवाईक नसताना…’

चंद्रकांत फुंदे, झी मीडिया

Vaishnavi Hagawane Death: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय असून त्याचा कुटुंबीयांवर खूप प्रभाव होता, असं संशय पोलिसांना आहे. त्याने वैष्णवीच्या बाळाला संभाळायची जबाबदारी कशी दिली? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळं पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य करत 3 जूनपर्यंत निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश विक्रांत खंदारे यांनी हा निर्णय सुनावला आहे.

आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ बोर्डरवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सुट्टीकालीन न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं आहे. या वेळी कोर्टात सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी आरोपीचा मोबाईल जप्त करायचा आहे. तसंच, वैष्णवीच्या बाळाला काय कारणाने जवळ ठेवले. याचीही चौकशी करायची आहे, असं न्यायालयात स्पष्ट केलं होतं. सरकारी वकिलांच्या या युक्तीवादावर निलेश चव्हाण याच्या वकिलांनी आशिलाचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळं पोलिस कोठडी मिळू नये. फक्त मोबाइल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. पिस्तुल परवाना त्यांच्याकडे आहे त्याचा कुठेही गैरवापर झालेला नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे.

आरोपीच्या वकिलांचा आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद

>> सरकारी वकील: आरोपी हा या दोन्ही कुटुंबाचा नातेवाईक नसतानाही त्याच्याकडे बाळ कसं ठेवलं? याची चौकशी करायची आहे. काल आरोपीला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. मयत आणि हगवणे कुटुंबाशी त्याचे या काळात नेमके काय संभाषण झाले त्याचा गुन्ह्यात काही रोल आहे का याची चौकशी करायची आहे. आरोपीला अधिकच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलानी केली आहे.

आरोपीचे वकीलः गुन्हा घडण्याआधी माझ्या अशिलाचा यात काहीच रोल नव्हता. फक्त बाळापुरता संबंध आलेला तोही सांभाळायला दिलं म्हणून.बाकी काही संबध नाही.

आरोपीचे वकीलः या प्रकरणात निलेशचा रोल काय आहे हे अद्याप सिद्ध झाले नाही आरोपिच्या वकिलांकडून युक्तिवाद. त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणे चुकीचे आहे. त्यांच्याकडे असणारे पिस्तूलचा कुठेही वापर झाला नाही

सरकारी वकील: निलेश चव्हाण हा हगवणे किंवा कस्पटे कुटुंबीयांचा नातेवाईक नसताना त्याच्याकडे बाळ कसे काय याचा तपास करायचा आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्यापूर्वी निलेश चव्हाण यांचा संवाद झाला आहे, याचा तपास करायचा आहे.

शासकीय सल्ला: मोबाईल डाटा डिलीट केला असेल ते त्याचा तपास करायचा आहे. त्याच्याकडे असणाऱ्या शस्त्राचा तपास करायचा आहे. त्याचा उद्देश काय होता याचा तपास करायचा आहे.

आरोपीचे वकीलः निलेश चव्हाणचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. अटक करायची आणि पुरावे रचले जात आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

पुणे खान कुटुंबाने आषाढी वारी सेवा सुरू ठेवली आहे, सर्व-विश्वास एकोपा कायम ठेवला आहे

0
आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
spot_img

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...

अमेरिकन व्यावसायिक पायलट म्हणाले- डिजिटल जगात घाई करू नका:फक्त टेक्स्ट मेसेजमुळे ओळख हिरावली; डोळ्यासमोर...

0
जर तुमच्या मुलांचे फोटो, बँक खात्यांचे पासवर्ड आणि तुमची डिजिटल ओळख एकाच 'की'ने सुरक्षित असतील आणि ती एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली, तर...
error: Content is protected !!