Homeमहाराष्ट्रवैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आईविना पोरकं झालेल्या बाळाचा सांभाळ आता...

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आईविना पोरकं झालेल्या बाळाचा सांभाळ आता ‘ही’ व्यक्ती करणार


सासरच्या जाचाला आणि हुंडा बळी ठरलेली वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाच काय होणार यासाठी सर्वांचं मनं हळवं झालं होतं. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचा 9 महिन्यांचा चिमुकला निलेश चव्हाण या व्यक्तीकडे होतो. त्याच्या ताब्यातून बाळाची सुटका करून ते बाळ कस्पटे कुटुंबाकडे सोपवण्यात आलं होतं. आईविना पोरकं झालेल्या या चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. याचा निर्णय बाल कल्याण समितीने घेतला आहे.

‘ही’ व्यक्ती करणार बाळाचा सांभाळ!

वैष्णवी हगवणे हिचा 9 महिन्यांचा बाळाचा सांभाळ त्याची आजी स्वाती आनंद कस्पटे करणार आहे. बाल कल्याण समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती हिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

ट्वीटमध्ये आदिती तटकरे म्हणाल्यात..

पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.

यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.

दरम्यान 23 मे पासून फरार असलेला निलेश चव्हाणला पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरुन अटक केली आहे. तर
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बद्रीनाथ व्हीआयपी दर्शन शुल्काचा वाद: ११०० रुपयांच्या शुल्कावर प्रश्नचिन्ह

0
डेहराडून22 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराबद्रीनाथ धाममध्ये देणगीतील गैरव्यवहाराचा वाद अजून शांत झाला नाही तोच आता दोन नवीन आर्थिक प्रकरणे चर्चेत आली आहेत. पहिले प्रकरण...

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ         धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री...

रामलला दरबार कॉर्पोरेट शैली | श्री राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख निवृत्त आय.ए.एस

0
सचिन मुदगल/संतोष सिंग. अयोध्या2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जबाबदाऱ्या आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. ट्रस्टींनी ठरवले आहे की कोणत्याही...

‘माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…’:ओक्साबोक्शी रडत ‘सैराट’ फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट...

0
'सैराट' चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र 'सल्या' (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे....
spot_img

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...
error: Content is protected !!