Homeदेश-विदेशअभियंत्याच्या घरावर छापा पडताच, खिडकीतून नोटांचा पाऊस अन्...; घरातील घबाड पाहून अधिकारी...

अभियंत्याच्या घरावर छापा पडताच, खिडकीतून नोटांचा पाऊस अन्…; घरातील घबाड पाहून अधिकारी चक्रावले


ग्रामीण बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्या निवासस्थानी दक्षता विभागाचे लोक येत आहे हे समजतातच खिडकीतून नोटांचा पाऊस पडायला लागला. या अभियंताच्या घरातील घबाड पाहून अधिकारीही चक्रावले. ही धक्कादायक बातमी आहे, ओडिशातील भुवनेश्वरमधील. ग्रामीण बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. यावेळी, पथकाने घटनास्थळावरून 2.1 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये भुवनेश्वर, अंगुल आणि पुरी जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा दक्षता पथक भुवनेश्वरमधील पीडीएन एक्झोटिका (डमडुमा) येथील मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा सारंगीने 500  रुपयांच्या नोटा खिडकीतून बाहेर फेकल्या. पथकाने तात्काळ कारवाई केली आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत फेकलेले पैसे जप्त केले.

नोटा मोजण्यासाठी मशीन मागवली!

दक्षता विभागाच्या म्हणण्यानुसार, सारंगीच्या ज्या मालमत्तांची झडती घेण्यात आली त्यात कराडगडिया (अंगुल) येथील एक दुमजली घर, भुवनेश्वरमधील दुमडुमा येथील एक फ्लॅट आणि पुरीमधील सिउला येथील आणखी एक फ्लॅटचा समावेश आहे. जप्त केलेल्या एकूण रोख रकमेपैकी 1 कोटी रुपये सारंगीच्या भुवनेश्वरमधील फ्लॅटमधून जप्त करण्यात आले . तर अंगुल येथील त्याच्या निवासस्थानातून 1.1 कोटी रुपये जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्यासाठी चलन मोजणी यंत्रांचा वापर केला. दक्षता विभागाच्या मते, छाप्यादरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त होणे हे भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकरण आहे. विभाग आता या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे. आता सारंगीने ही मालमत्ता कशी मिळवली हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एकूण 7 ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यात 8 उपअधीक्षक, 12 निरीक्षक, 6 एएसआय आणि इतर अधिकारी सहभागी होते. विशेष न्यायाधीश (दक्षता) अंगुल यांनी जारी केलेल्या शोध वॉरंटनुसार ही कारवाई करण्यात आली. सारंगी यांच्या कार्यालयाची (मुख्य अभियंता, आरडी प्लॅनिंग अँड रोड, भुवनेश्वर) देखील झडती घेण्यात आली.  दक्षता अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही फक्त प्राथमिक जप्ती आहे आणि छापे अजूनही सुरू आहेत. सारंगी यांच्या जंगम आणि अचल मालमत्तेचे मूल्यांकन केले जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आज मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल:मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी सतर्क राहावे, मंगळ...

0
आज (20 जून) रात्री मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळ 2 ऑगस्टपर्यंत वृषभ राशीतच राहील. मंगळाच्या या राशी बदलामुळे मिथुन, तूळ आणि कुंभ...

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज अंतिम फैसला:पक्षांतराच्या चर्चेमुळे ओमराजेंच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

0
नवी मुंबईच्या कळंबोलीत 2006 मध्ये भरदिवसा झालेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेला आज दोन दशके पूर्ण झाल्यानंतर,...

देणगी चोरी प्रकरणी VHPने म्हटले- हिशोबासाठी ट्रस्ट जबाबदार:SITने तपासाची व्याप्ती वाढवावी, मंदिराच्या नावाखाली देणग्या...

0
हरिद्वारमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी संपली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विहिपने अयोध्या राम मंदिर देणगी वादाच्या...
spot_img

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...
error: Content is protected !!