Homeमनोरंजन'सेक्सी म्हणावं असं...' अभिनेत्री प्राची पिसाटच्या आरोपांवर अखेर म्हशीलकरांनी दिलं थेट उत्तर

‘सेक्सी म्हणावं असं…’ अभिनेत्री प्राची पिसाटच्या आरोपांवर अखेर म्हशीलकरांनी दिलं थेट उत्तर


प्राची पिसाट संदेश पंक्ती: गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत एकाच विषयांवर चर्चा आहे. जेष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिनेत्री प्राची पिसाट हिला काही मेसेज करण्यात आले होते. प्राचीने या मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सुदेश म्हशीलकर यांनी प्राचीला आक्षेपार्ह मेसेज केले, असा दावा तिने केला होता. या सगळ्या प्रकरणांवर आता सुदेश यांनी मौन सोडलं आहे. प्राचीच्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिलं आहे.

सुदेश यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकं काय घडलं हे त्यांना सविस्तरच पोस्टमध्ये मांडलं आहे. सुदेश यांनी म्हटलं आहे की, ‘खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.’

काय आहे सुदेश म्हशीलकर यांची पोस्ट?

1) ‘हा मेसेज खरंच मीच केला का?’
तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला?  याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे.
आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे  त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

2) ‘अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप’
मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं असं दिसेल. जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना ‘असं का पाठवलं?’ एवढं तरी कुणीही विचारलं असतं. पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.

3) ‘फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?’
माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.

4) ‘पाच दिवस उत्तर का दिलं नाही?’
मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही.  हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो  कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.

5) ‘प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?’
माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.

6) ‘बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?’
‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात, आणि माझ्या पत्नीच्या हातचं जेवण प्रेमाने खातात आपण जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा तू सुद्धा तिच्या हातचं जेवलीयस. या सगळ्या गोष्टींबद्दल कुणाला काही तपासायचं असेल, कुणाला काही विचारायचं असेल तर माझी अजिबात हरकत नाही.

प्रतिष्ठा ही काचेसारखी असते पारदर्शक, पण नाजूक. कोणीतरी एक दगड फेकतो आणि आरसा मोडतो.आज तो क्षण मी गाठलाय आणि तो शांतपणे पाहतोय.वैयक्तिक पातळीवर एवढंच सांगावंसं वाटतं की जर हे सर्व केवळ बदनामीसाठी केलं जात असेल, तर ते नक्कीच खेदजनकआहे. मी हा विषय इथे संपवत आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचे मनःपूर्वक आभार.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रामलला दरबार कॉर्पोरेट शैली | श्री राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख निवृत्त आय.ए.एस

0
सचिन मुदगल/संतोष सिंग. अयोध्या2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जबाबदाऱ्या आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. ट्रस्टींनी ठरवले आहे की कोणत्याही...

‘माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…’:ओक्साबोक्शी रडत ‘सैराट’ फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट...

0
'सैराट' चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र 'सल्या' (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे....

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जीवनात सुख-शांती, समाधान आपल्या ज्ञान, समजूतदारपणा, सत्य आणि सकारात्मक विचारांवर...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जीवनातील आनंद, शांती आणि समाधान हे आपले ज्ञान, शहाणपण, सत्यता आणि सकारात्मक...

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...
error: Content is protected !!