Homeमनोरंजनआयपीएल 2025 आरसीबी वि पीबीक्स क्वालिफायर 1 सामना पंजाब किंग्ज रजिस्टरड सर्वात...

आयपीएल 2025 आरसीबी वि पीबीक्स क्वालिफायर 1 सामना पंजाब किंग्ज रजिस्टरड सर्वात कमी स्कोअर प्ले ऑफ आयपीएल इतिहासातील रेकॉर्ड


आयपीएल 2025: आयपीएल 2025 चा क्वालिफायर 1 सामना गुरुवार 29 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab Kings VS Royal Chellengers Bengluru) यांच्यात खेळवला गेला.  महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना पार पडला असून यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 विकेटने पंजाबवर विजय मिळवला. यासह त्यांनी थेट फायनलमध्ये धडक दिली आहे. टॉप 2 वर असणाऱ्या पंजाब किंग्सच्या फलंदाजांचा परफॉर्मन्स फ्लॉप ठरला. तीन फलंदाज वगळता इतर फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या सुद्धा करता आली नाही त्यामुळे 101 धावांवर आरसीबीने त्यांना ऑल आउट केले. यासह पंजाब संघाच्या नावावर आयपीएलमध्ये नकोसा विक्रम नोंदवण्यात आला असून आयपीएलच्या इतिहासात 2008 नंतर पहिल्यांदाच असं घडलं.

पंजाब किंग्सची बॅटिंग गडगडली :

महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या कर्णधारांमध्ये सामन्यापूर्वी टॉस झाला. हा टॉस आरसीबीने जिंकून गोलंदाजी निवडली तर पंजाबला प्रथमी फलंदाजीचे आव्हान दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सच्या एकही फलंदाजाला फारकाळ मैदानात टिकू दिले नाही. पंजाबकडून सर्वाधिक धावा प्रभसिमरन सिंह (18), मार्कस स्टोनिस (26) आणि अझमतुल्लाह उमरझाई (18) यांनी केल्या. तर उर्वरित फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या सुद्धा करता आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांपैकी पंजाबच्या सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट सुयश शर्मा आणि जॉश हेजलहूडने घेतल्या. यश दयालने 2 आणि भुवनेश्वर कुमार तसेच रोमॅरियो शेफर्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सला 14.1 ओव्हरमध्ये 101 धावांवर ऑल आउट केले. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी 102 धावांचे आव्हान मिळाले होते.

हेही वाचा : RCB ने रचला इतिहास, IPL प्लेऑफमध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिली टीम

नकोसा विक्रम केला नावावर :

आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सला 14.1 ओव्हरमध्ये 101 धावांवर ऑल आउट केले. आयपीएलच्या इतिहासात असं प्रथमच घडलं जेव्हा कोणताही संघाने प्लेऑफ सामन्यात इतक्या कमी ओव्हर्स खेळला. पंजाब किंग्स केवळ 14.1 ओव्हर खेळू शकले. यापूर्वी 2008 मध्ये प्लेऑफ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 16.1 ओव्हर खेळल्या होत्या. यासह पंजाब किन्हस प्लेऑफमध्ये सर्वात कमी धावा करणारा चौथा संघ ठरला आहे. याआधी 2010 मध्ये डेक्कन चार्जर्सने आरसीबीविरुद्ध 82 धावा, 2008 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्स विरुद्ध  2008 मध्ये 87 धावा, 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 101 धावा केल्या होत्या. आता 2025 मध्ये पंजाब किंग्सने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 101 धावा केल्या आहेत.

RCB ची चौथ्यांदा फायनलमध्ये धडक :

पंजाब किंग्सने आरसीबीला विजयासाठी 102 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान आरसीबीने 8 विकेट राखून पूर्ण करत सामना जिंकला. यात आरसीबीकडून फलंदाज फिलिप सॉल्टने 56, विराट कोहलीने 12, मयंक अग्रवालने 19, रजत पाटीदारने 15 धावा केल्या.  आरसीबी क्वालिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्सला धूळ चारून आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. आता पंजाब किंग्सला फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी एलिमिनिटर सामन्यातील विजेत्या सोबत क्वालिफायर 2 सामन्यात विजय मिळवावा लागेल. आरसीबी यापूर्वी 2009, 2011 आणि 2016 यावर्षी सुद्धा आयपीएल फायनल खेळली होती. मात्र यात फायनल सामन्यात विजय मिळवण्यात त्यांना अपयश आलं होतं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!