भारतीय 59 देशांपर्यंत व्हिसा विनामूल्य प्रवास करू शकतात: परदेशात फिरायला जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नागरिक तब्बल 59 देशांमध्ये आता व्हिसाशिवाय प्रवास करू शकतील. ज्यामध्ये आता फिलीपिन्स देखील या यादीत सामील झाला आहे. नवीन धोरणांतर्गत पर्यटकांना दोन श्रेणींमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश सुविधा मिळणार आहे.
14 दिवसांचा व्हिसा-मुक्त प्रवास मिळविण्यासाठी भारतीय नागरिकांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील. भातरतीयांना केवळ पर्यटनाच्या उद्देशाने प्रवास करता येमार आहे. परतीचे तिकीट किंवा पुढील गंतव्यस्थानाच्या प्रवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. कोणताही नकारात्मक इमिग्रेशन इतिहास नसला पाहिजे. पासपोर्टची वैधता किमान 6 महिने असले पाहिजे. राहण्याची खात्री (हॉटेल बुकिंग) आणि सहलीचा खर्च परवडण्याची क्षमता असल्याचा पुरावा उदा बँक स्टेटमेंट सादर करावे लागेल. जर एखादा प्रवासी या अटी पूर्ण करत नसेल, तर तो पूर्वीप्रमाणेच ई-व्हिसा प्रक्रियेअंतर्गत अर्ज करू शकतो. संबधीत प्रवाशाला ई-व्हिसा 30 दिवसांची एकेरी प्रवेश परवानगी दिली जाणार आहे.
भारतीय पासपोर्ट धारकांना 59 देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा मिळणार आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, 2025 मध्ये भारतीय पासपोर्ट 81 व्या क्रमांकावर आहे. यापैकी काही लोकप्रिय देश आहेत जिथे प्रत्येकाला जायचे आहे. ज्यामध्ये मालदीव, मॉरिशस, इंडोनेशिया, थायलंड, भूतान, नेपाळ, फिजी, केनिया, झिम्बाब्वे, सेनेगल, पलाऊ आणि वानुआटु यांचा समावेश आहे.
भारतीयांसाठी व्हिसा फ्री एंट्री असलेल्या 59 देशांची यादी
मलेशिया, मालदीव, मार्शल आयलंड, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मंगोलिया, म्यानमार, मॉन्सेरात, मोझांबिक, अंगोला, बार्बाडोस, भूतान, बोलिव्हिया, ब्रिटीश व्हर्जिन आयलंड, बुरुंडी, कंबोडिया, केप वर्डे आयलंड्स, कोमोरो आयलंड, कोमोर आयलंड्स, कोमोकोन आयलंड. इथिओपिया, फिजी, ग्रेनाडा, गिनी-बिसाऊ, हैती, इंडोनेशिया, इराण, जमैका, जॉर्डन, कझाकस्तान, केनिया, किरिबाटी, लाओस, मकाऊ, मादागास्कर, नामिबिया, नेपाळ, नियू, पलाऊ, कतार, रवांडा, सामोआ, सेशेल्स, सिएरा लिओन, साविस, साविस, साविस, नेविस, पलाऊ, कतार. सेंट व्हिन्सेंट, टांझानिया, थायलंड, तिमोर-लेस्टे, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुवालू, वानुआतु, झिम्बाब्वे, फिलीपिन्स.
अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, शेंजेन देश, सिंगापूर किंवा युनायटेड किंग्डमचा वैध व्हिसा किंवा कायमस्वरूपी निवास परवाना धारण करणारे भारतीय 30 दिवसांपर्यंत व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात. यासाठी देखील वरीलप्रमाणेच अटी लागू होतील.






























