Homeदेश-विदेशआर्क्टिक प्रदेशात चीनला रस का आहे यूएसए आणि रशियन जवळजवळ शर्यतीत आहेत...

आर्क्टिक प्रदेशात चीनला रस का आहे यूएसए आणि रशियन जवळजवळ शर्यतीत आहेत हवामान बदल हे खरे कारण आहे


चीन जगातील सर्वात थंड प्रदेशात गुंतवणूकीत रस आहे: जगाचा नकाशा डोळ्यापुढे घेतला की, अमुक एका ठिकाणाचं नकाशात असणारं स्थान नकळत त्या ठिकाणाच्या भूगोलावर उजेड टाकत असतो. थोडं शालेय जीवनातील अभ्यासक्रमात डोकावलं असता हा नकाशा डोळ्यांपुढे आणणं अधिक सोपं होईल. याच नकाशावर असणाऱ्या अतिशय दूरवरच्या एका प्रदेशावर, जिथं सूर्यप्रकाशाचा अभाव आहे अशा भागात सध्या आशियाई देश चीन लक्ष ठेवून असल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे महिनोन् महिने इथं सूर्योदयसुद्धा होत नाही, मग अशा या भागात पैसा ओतण्यासाठी चीन इतका उत्सुक का बरं आहे? हा प्रश्नसुद्धा आता उपस्थित होत आहे.

लक्षात घेण्याजोडी बाब…

पृथ्वीवर अंटार्क्टिक आणि आर्क्टिक असे दोन ध्रुव आहेत. अनुक्रमे त्यांना दक्षिण आणि उत्तर ध्रुव असंही म्हटलं जातं. बर्फाचं अच्छादन असणाऱ्या, नजर जाईल तिथं हिमाच्छादित डोंगर आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीची चिन्हं दिसतात अशा या भागामध्ये सध्या अचानकच महासत्ता राष्ट्रांचं स्वारस्य वाढलं आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे बहुतांशी निर्मनुष्य असणाऱ्या या भागासाठी महासत्ता देश अर्थात चीन, रशिया आणि अमेरिकेमध्ये रस्सीखेच सुरू असून, त्यामागेही एक महत्त्वाचं कारण आहे.

बर्फाळ प्रदेशाकडे का वाढला महासत्तांचा कल?

पृथ्वीच्या अतीव उत्तरेकडे असणारा भाग आर्क्टिक सर्कल यामुळं ओळखला जातो. या भागात अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, स्वीडन, रशिया, आईसलँड या देशांच्या काही भागाचा समावेश होतो. या सर्कलमध्ये येणारा उर्वरित संपूर्ण भाग निव्वळ बर्फाच्छादित प्रदेश.

हेसुद्धा वाचा : अद्भूत! भारतातील एक असं गाव, जिथून दुर्बिणीशिवाय दिसते दुसरी आकाशगंगा; इथे असते सर्वात काळीकुट्ट रात्र, अन लख्ख चांदणं…

जाणून आश्चर्य वाटेल पण, इथं ऑक्टोबर महिन्यात सूर्योदय होतो आणि त्यानंतर थेट फेब्रुवारीमध्ये इथं सूर्यदर्शन होतं. दरम्यानच्या काळात या भागामध्ये सूर्यकिरणं, सूर्य नामशेष असतो असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. दरम्यानच्या काळात या भागात काळीकुट्ट रात्र आणि हाडं गोठवणारी थंडी असते. इतकी की,  तापमानाचा आकडा उणे चाळीस अंशांच्या घरात पोहोचतो.

चीन याच भागात पैसा ओतणार, हे खरंय?

उपलब्ध माहितीनुसार याच काहीशा अनपेक्षित प्रदेशामध्ये Real Estate क्षेत्राला नवी झळाळी देत तिथं आर्थिक गुंतवणूक करण्यास चीन उक्सुक आहे. इथं कायमस्वरुपी हजेरी दाखवत चीननं स्वत:ला ‘आर्क्टिकच्या जवळ असणारा’ देश म्हणूनही संबोधण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या या भूमिकेला अमेरिका, रशियासोबतच भारतही काही अंशी आव्हान देत या स्पर्धेत उडी घेताना दिसत आहेत.

वस्तूस्थिती लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं

पृथ्वीच्या विविध भागांमधील एकंदर तापमानाचा आकडा पाहता या क्षेत्रामध्ये झपाट्यानं तापमानवाढ होत आहे, परिणामी बर्फाची चादर वितळून भविष्यात इथं निर्माण होणाऱ्या प्रगतीच्या संधी दृष्टीक्षेपात ठेवत चीननं अचानक इथं मोर्चा वळवला आहे. बर्फाचा थर कमी होत असल्यामुळं खनिजसंपत्ती, नैसर्गिक वायू आणि तेलसाठ्यांपर्यंत पोहोचणं सहज शक्य आणि सोपं होऊ शकतं याकडे चीनचं संपूर्ण लक्ष आहे आणि म्हणून इथं असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वाटा मिळवण्यासाठी म्हणून चीनची धावपळ सुरू असल्याचं कळत आहे.

आर्क्टिकमध्ये बर्फाची चादर दिवसागणिक कमी होत असल्यामुळं या भागात सागरी व्यापार आणि वाहतूक मार्हांसंदर्भातही अनेक देश लक्ष घालत असून चीनचं सर्वस्वी लक्ष हे तूर्तास आर्क्टिकमधील नैसर्गिक संसाधनांवरच आहे हेच खरं. आश्चर्यकारकरित्या चीन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये आर्क्टिकच्या किनारपट्टी भागात लष्करी सहकार्य असून या भागात दोन्ही देशांमध्ये लष्करी सरावही झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं आता चीन या भागात पुढे सरसावण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलणार हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल यात शंका नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन...

0
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'दंगलकार' नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता...

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!