Homeदेश-विदेशग्लू मार्क्समुळे अमेरिकन सुरक्षा एजन्सींनी भारतीय व्यक्तीला अटक केली. त्याने 7 देशांचा...

ग्लू मार्क्समुळे अमेरिकन सुरक्षा एजन्सींनी भारतीय व्यक्तीला अटक केली. त्याने 7 देशांचा प्रवास केला. 45 लाख रुपये खर्च अमेरिकेच्या तुरूंगातील सेलमध्ये होते.


यूएसए मधील भारतीय माणूस: प्रत्येक गोष्टीत नशीबाची थोडी साथ लागतेच असं म्हटलं जातं. नशीबाची साथ नसेल तर अगदी शेवटच्या क्षणी अपयश पदरात पडू शकतं. असाच काहीसा प्रकार एका भारतीयाबरोबर घडला आहे. पासपोर्टच्या पानावर गोंद (कागद चिटकवायच्या गमचे) ठसे आढळून आल्याने पंजाबमधील 27 वर्षीय तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली. त्याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं आहे. जालंधरमधील गुट्टारन गावातील रहिवासी असलेल्या पृथ्वीपाल सिंगसोबत हा प्रकार घडला आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांच्या पडताणीदरम्यान बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट व्हिसावर कागद चिकटवणाच्या गमचे ठसे आढळून आल्याने सखोल चौकशी केली असता पृथ्वीपालचा भांडाफोड झाला. त्याला भारतात परत पाठवण्यापूर्वी अमेरिकेमध्ये चार महिने तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली आहे.

अमेरिकेत जाण्यासाठी 30 लाख मोजले

लाखो भारतीयांप्रमाणे पृथ्वीपाल सिंगनेही अमेरिकेत नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने अजितपाल सिंग नावाच्या एका एजंटची मदत घेतली. अजितपालने 30 लाख रुपयांच्या मोबदल्यात तुला अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी अगदी हवी ती मदत करतो असं आश्वासन पृथ्वीपालला दिलं आणि पृथ्वीपाल त्याच्या जाळ्यात अडकला.

चार देशांमधून प्रवास अन् तीन वर्षांचा वेटींग पिरिएड

अजितपालने मागणी केल्याप्रमाणे पृथ्वीपालने सुरुवातीला त्याला 30 लाख रुपये दिले. अजितपालने त्यानंतर पृथ्वीपालला दुबईला पाठवले. दुबईमध्ये एक महिना राहिल्यानंतर पृथ्वीपालला सर्बिया, रोमानिया आणि शेवटी फ्रान्समार्गे अमेरिकेत पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. फ्रान्समध्ये असताना पृथ्वीपाल आणि अजितपाल यांच्यात पैशांवरून मोठा वाद निर्माण झाला. ज्यामुळे अजितपालने हात वर केले आणि पृथ्वीपालला फ्रान्समध्येच सोडून दिलं. सुमारे दोन ते तीन वर्षे फ्रान्समध्ये अडकलेल्या पृथ्वीपालला बऱ्याच प्रयत्नानंतर दुसरा एजंट सापडला. हरप्रीत सिंग नावाच्या या एजंटने 15 लाख रुपयांची मागणी केली. 15 लाखांमध्ये नक्कीच मी तुला अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी मदत करु शकतो, तू निश्चिंत राहा असं हरप्रीतने पृथ्वीपालला सांगितलं.

चार देशांमधून अमेरिकेच्या शेजारच्या देशात पोहोचला

पृथ्वीपालकडून पैसे मिळाल्यानंतर हरप्रीत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पृथ्वीपालला नेदरलँड्स, पनामा, निकाराग्वा आणि ग्वाटेमाला मार्गे मेक्सिकोमध्ये आणण्याचं नियोजन केलं. ही माहिती इंडियन गोल्ड कोस्ट विमानतळावरील अतिरिक्त पोलिस आयुक्त उषा रंगनानी यांनी दिली आहे.

त्या एका चुकीमुळे पकडला गेला

मेक्सिकोमध्ये पोहोचलेल्या पृथ्वीपालच्या पासपोर्टवर हरप्रीतच्या टोळीकडून बनावट व्हिसा लावण्यात आला. याच बनावट व्हिसाच्या आधारे पृथ्वीपालने बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला. अमेरिकेत पोहोचल्यानंतर, पृथ्वीपालने पासपोर्टवरील बनावट व्हिसा काढून टाकला. मात्र त्याच्या पासपोर्टच्या पानावर गोंद लावून काहीतरी चिटकवण्यात आल्याच्या खुणा राहिल्याने अमेरिकन सुरक्षा संस्थामधील कर्मचाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी पृथ्वीपालला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. 1 आणि 2 मेदरम्यानच्या रात्री पृथ्वीपाल दिल्लीमधील इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर परतला. अमेरिकी यंत्रणांनी त्याला भारतात परत पाठवल्याने तो येणार याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना आधीपासूनच होती.

त्या तिघांना अटक

पृथ्वीपालला दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. विमानतळ पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, पृथ्वीपालने अजितपाल सिंग, संजीव आणि सरबजीत सिंग यांनी कट रचून आपल्याला या साऱ्यात अडकवल्याचा दावा केला. अजितपाल आणि संजीव यांना तातडीने अटक करण्यात आली. मात्र सरबजीतला अटक करण्यासाठी पोलिसांना 20 दिवस लागले. पोलिसांनी सरबजीतला 22 मे रोजी अटक केली. पृथ्वीपालप्रमाणे या टोळीने इतर कोणाला अशाप्रकारे अमेरिकेत पाठवण्याचा प्रयत्न केलाय किंवा पाठवलंय का याचा शोध आता पोलीस घेत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन...

0
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'दंगलकार' नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता...

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!