मनोहर लाल ढाकाद: मंदसौर जिल्ह्याचा भाजप नेता मनोहर लाल धाकडचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यात दिल्ली-मुंबई महामार्गावर उघड्यावर एका महिलेसोबत तो अश्लील कृत्य करताना दिसला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला गेल्या रविवारी अटक करण्यात आली. यानंतर त्याला गरोथ उप-जेलमध्ये पाठवण्यात आले. त्याच्यावर पुढे काय कारवाई झाली? मनोहर लाल धाकडचा व्हिडीओ कोणी व्हायरल केला? त्यामागे काय कारणं होती? याबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मनोहर लाल धाकडला सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्याला जामिनावर सोडण्यात आलंय. तर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित टोल कंपनीने 3 टोल कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय.
जामीन कसा मिळाला?
काही दिवसांपूर्वी मंदसौर जिल्हा पंचायत सदस्याचे पती आणि भाजप नेते मनोहर लाल धाकडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो रस्त्याच्या मधोमध उघड्यावर एका महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दिसतोय. हा आक्षेपार्ह व्हिडिओ दिल्ली-मुंबई 6 लेन एक्सप्रेसवेचा आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर मंदसौरमधील भानपुरा पोलीस ठाण्यात मनोहर धाकड आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मनोहरलाल धाकडला अटक करून तुरुंगात टाकले. आणि सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्याला जामिनावर सोडण्यात आले. जामीनपात्र कलमांमुळे धाकडला सहज जामीन मिळाल्याचे सांगण्यात येतंय.
80 हजार रुपये न मिळाल्याने व्हिडिओ व्हायरल
दिल्ली-मुंबई 8 लेन एक्सप्रेस वेवर उघड्यावर सेक्स केल्याचा आरोप असलेला भाजप नेता मनोहर धाकडने चौकशीदरम्यान पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. नीमथूर पॉइंटजवळ एनएचएआयच्या 6 ते 8 कर्मचाऱ्यांनी आमच्या गाडीला घेरले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आम्हाला ब्लॅकमेल करण्यास त्यांनी सुरुवात केल्याची माहिती मोहनलालने पोलिसांना दिली. ब्लॅकमेल करणाऱ्यांनी माझ्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. माझ्याकडे 20 हजार रुपयांची कॅश होती जी मी त्यांना दिली. उर्वरित 80 हजार रुपये घेऊनही त्यापैकी एकाने व्हिडिओ व्हायरल केल्याचे त्याने पुढे पोलिसांना सांगितले.
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
भाजप नेता मनोहर धाकडचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 3 टोल प्लाझा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. हे तिघेही एमकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कर्मचारी असून व्हायरल व्हिडिओबाबत एमकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला माहिती देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संदीप पाटीदार यांनी दिली. निष्काळजीपणाच्या आरोपाखाली तिघांनाही नोकरीवरून काढून टाकल्याचेही ते पुढे म्हणाले.
ती महिला कोण?
व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मंदसौर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे आणि तिच्या बदलीबाबत ती मनोहरलाल धाकड यांच्या संपर्कात आली होती, असा दावा एका काँग्रेस नेत्याने केलाय. संबंधित महिला सरकारी शाळेत शिक्षिका आहे. आरोपी नेत्याची पत्नी जिल्हा पंचायतीची सदस्य आहे, ही माहिती खरी असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केलाय. सरकारी शाळादेखील जिल्हा पंचायतीच्या अंतर्गत येतात. त्यामुळे नेत्याने संबंधित शिक्षिकेला तिच्या नोकरीबाबत बदलीची किंवा राजकीय प्रलोभनाची भीती दिली असावी. त्यामुळे हे प्रकरण बलात्कारापर्यंत जाऊ शकते, त्यामुळे पोलिस तपास निष्पक्ष असावा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
महिलेला लवकरच अटक केली जाईल- पोलीस
मंदसौरच्या भानपुरा पोलिसांनी मनोहरलाल आणि त्याच्या महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य निंदनीय आहे. महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेची ओळख पटलीय. ती मनोहरलालची जुनी मैत्रिण असल्याची माहिती डीआयजी मनोज सिंह यांनी दिली. पोलीस पथक महिलेचा शोध घेत असून लवकरच त्या महिलेलाही अटक केली जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.





























