HomeमनोरंजनIPL 2025 दरम्यान पंजाब किंग्समध्ये वाद, प्रीती झिंटा पोहोचली कोर्टात, 'या' प्रकरणात...

IPL 2025 दरम्यान पंजाब किंग्समध्ये वाद, प्रीती झिंटा पोहोचली कोर्टात, ‘या’ प्रकरणात दाखल केला गुन्हा


आयपीएल 2025: IPL 2025 स्पर्धा आता अतिशय रंगात आली आहे. प्लेऑफचे 4 संघ आता ठरले असून चौघांमध्ये आता टेबल टॉप करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. श्रेयस अय्यरच्या (Sheryas Iyyer) नेतृत्वात पंजाब किंग्सने सुद्धा यंदा प्लेऑफमध्ये धडक दिली असून ते सध्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्स संघाचा परफॉर्मन्स स्पर्धेत चांगला असला तरी त्यांच्या फ्रेंचायजीमध्ये सर्व काही ठीक नाही. पंजाब किंग्सची (Punjab Kings) सहमालकिण प्रीती झिंटाने (Preity Zinta) आपले बिझनेस पार्टनर मोहित बर्मन आणि नेस वाडिया यांच्या विरोधात न्यायालयात केस दाखल केली आहे. प्रीति जिंटा, नेस वाडिया आणि मोहित बर्मन पंजाब किंग्स संघात पार्टनर आहेत. पंजाब किंग्सचा संघ हा केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत येते. यात मोहित बर्मनकडे 48 टक्के शेअर्स असून, प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्याकडे 23-23 टक्के शेअर्स आहेत. तर उर्वरित शेअर्स हे करण पॉलकडे आहेत.

पंजाब किंग्समध्ये वाद :

पंजाब किंग्समध्ये हा संपूर्ण वाद हा 21 एप्रिल 2025 रोजीआयोजीत करण्यात आलेल्या एक्स्ट्रा-ऑर्ड‍िनेरी जनरल मीट‍िंगला घेऊन सुरु झाला. प्रीती झिंटाने आरोप लावला होता की ही मिटिंग कंपनी अधिनियम 2013 आणि अन्य सचिवीय नियमांनुसार योग्य प्रक्रिया पालन केल्याशिवाय आयोजित करण्यात आली होती. प्रीती झिंटाने यापूर्वी 10 एप्रिल रोजी इमेल द्वारे या एक्स्ट्रा-ऑर्ड‍िनेरी जनरल मीट‍िंगवर आपत्ती असल्याचे सांगितले होते, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

हेही वाचा : Arshad Khan: गुजरातचा गोलंदाज तोंडावर आदळला, 4 चेंडूत 2 वेळा घसरला, अंगावर शहारा आणणारा VIDEO

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्रीती झिंटाने न्यायालयाला ही एक्स्ट्रा-ऑर्ड‍िनेरी जनरल मीट‍िंग अवैध्य घोषित करण्यात यावी अशी मागणी केली होती. प्रीती झिंटा बिझनेस पार्टनर करण पॉल सोबत या मिटिंगमध्ये सामील झाली होती. परंतु दोघांनी या कार्यवाही दरम्यान मुनीश खन्ना याला डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यास विरोध केला. प्रीती झिंटा आणि करण पॉल याचा विरोध असताना सुद्धा मोहित बर्मनने नेस वाडियाच्या समर्थनात मिटिंग सुरु ठेवली. प्रीती झिंटाने न्यायालयाला विनंती केली आहे की ही बैठक अवैध घोषित करावी आणि मुनीश खन्ना यांना डायरेक्टर म्हणून काम करण्यापासून रोखावे. त्यांनी बैठकीदरम्यान घेतलेले कोणतेही निर्णय थांबवण्यास सांगावे.

पंजाब किंग्सचा सपोर्ट करतेय प्रीती झिंटा :

कायदेशीर लढाई सुरु असताना सुद्धा, प्रीटी झिंटा आयपीएल 2025 हंगामात पंजाब किंग्स संघाला पाठिंबा देत आहे, पंजाब संघाने या सीजनमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने 2014 नंतर प्रथमच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब किंग्सला लीग स्टेजचे दोन सामने अजून खेळायचे आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंटरकास्ट मॅरेज, शिमल्यात हनिमून, नंतर ऑस्ट्रेलियाला गेली पत्नी:आता परत येण्यास नकार, ₹34 लाखांच्या कर्जात...

0
आंतरजातीय विवाहानंतर पत्नीसोबत परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील संजीव कुमारचे आयुष्य 4 वर्षांत पूर्णपणे बदलले. लग्नाच्या अवघ्या एका...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेतून फायदा होईल, मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
5 जुलै, रविवारी सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा अडकलेला बोनस किंवा इंक्रीमेंट मंजूर होण्याची शक्यता...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड,...

0
भंडारा - स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
error: Content is protected !!