HomeमनोरंजनMouth Cancer Symptoms: प्रत्येक वेळी तोंडाचे अल्सर हलक्यात घेऊ नका! ही असू...

Mouth Cancer Symptoms: प्रत्येक वेळी तोंडाचे अल्सर हलक्यात घेऊ नका! ही असू शकते कॅन्सरची चाहुल; धोकादायक लक्षणं ओळखा

मराठी मध्ये तोंड कर्करोगाची लक्षणे: अनेक लोकांना तोंड येत म्हणजे तोंडात अल्सर येतात. तोंडात अल्सर येण्यामागे अनेक वेगवेगळी कारणं असतात. मसालेदार पदार्थांचं अतीसेवन, अपुरी झोप, गरम चहा कॉफी किंवा जीवनसत्वांची कमतरता हे साधारणं कारणं असतात. त्यामुळे तोंड आल्यास किंवा अल्सर झाल्यास त्याच्याकडे साधारण आपण दुर्लक्ष करतो. पण वरच्या वर आणि गंभीर स्वरुपात अल्सर येत असेल तर याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं. तोंडात अल्सर हे कॅन्सरच लक्षण असण्याची दाट शक्यता असल्याचे डॉक्टर सांगतात. कॅन्सर हा धोकादायक आणि जीवघेण्या आजार आहे. कॅन्सरचे लक्षणं हे लगेचच लक्षात येत नाही. त्यामुळे अल्सर आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.

भारत हा जगातील अशा देशांमध्ये समाविष्ट आहे जिथे तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. याचं एक प्रमुख कारण म्हणजे तंबाखू आणि गुटख्याचे सेवन, पण हा धोका आता धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढत असल्याच समोर आलं आहे. विशेषतः ज्यांना वारंवार तोंडात अल्सर असतात किंवा ज्यांच्या जखमा बराच काळ बऱ्या होत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, जर फोड दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरा झाला नाही, वेदना आणि रक्तस्त्राव होत असेल किंवा पांढरा किंवा लाल ठिपका बनला असेल तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकतं.

धोकादायक लक्षणं कशी ओळखावी?

* दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ न बरा होणारा फोड
* फोडाच्या जागी असामान्य पांढरा किंवा लाल ठिपका
* चघळण्यास किंवा बोलण्यास त्रास होणे
* जबडा किंवा घशात घट्टपणा जाणवणे
* सतत दुर्गंधी येणे
* अचानक वजन कमी होणे

जर तोंडाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळला तर तो उपचार करण्यायोग्य आहे. म्हणून, वेळेवर तपास आणि दक्षता खूप महत्वाची आहे. जर तुम्ही तंबाखू, गुटखा किंवा सुपारीचे सेवन करत असाल तर नियमित दंत तपासणी करणे ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे. डॉक्टरांच्या मते, सुपारी, अल्कोहोल, तोंडाची अस्वच्छता आणि एचपीव्ही विषाणूमुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आरोग्य मंत्रालय आणि दंत तज्ञ सल्ला देतात की जर तोंडात वारंवार अल्सर येत असतील किंवा कोणतेही असामान्य बदल दिसून येत असतील तर ताबडतोब तज्ज्ञांशी संपर्क साधा.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे...

0
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पायी पालखी सोहळयाचे रविवारी ता. ५ पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
spot_img

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...

Instagram बाल अत्याचार जाहिराती अवरोधित; मेटा 7-दिवसांची सूचना दिली

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंस्टाग्रामवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींबाबत सरकारने मूळ कंपनी मेटाला नोटीस पाठवली. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, कंपनीला...
error: Content is protected !!