Homeमनोरंजनआयपीएल 2025 प्लेऑफ परिदृश्य जर पावसाने धुतले तर काय होते मी वि...

आयपीएल 2025 प्लेऑफ परिदृश्य जर पावसाने धुतले तर काय होते मी वि डीसी सामना मुंबई विरुद्ध दिल्ली


आयपीएल 2025 प्लेऑफ परिस्थिती एमआय वि डीसी सामना: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघादरम्यान आज मुंबईमध्ये इंडियन प्रिमिअर लीगचा अत्यंत महत्त्वाचा सामना पार पडणार आहे. या सामन्यावर प्ले ऑफसाठी दोन्ही संघ पात्र होणार की नाही हे ठरणार आहे. मात्र आज मुंबईत होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळेच पाऊस पडला आणि सामना झालाच नाही तर कोणता संघ अधिक अचडणीत येणार याबद्दल चाहत्यांमध्येही संभ्रम आहे. आजचा सामना पावसामुळे झालाच नाही आणि गुण वाटून दिले तर मुंबई इंडियन्सला फायदा होणार की दिल्लीला हे समजून घेऊयात…

तिघे पात्र, एक जागा दोन संघांमध्ये चुरस

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली यंदाचं पर्व खेळणाऱ्या दिल्लीचा संघ आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ खेळण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या एकमेव जागेसाठी आमने-सामने आहेत. आतापर्यंत गुजरात, पंजाब आणि बंगळुरुचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळेच अव्वल चार संघांमध्ये येण्यासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये स्पर्धा दिसत आहे. या दोन्ही संघांना त्यांचे उरलेल्या सामन्यामध्ये विजय आवश्यक आहे. मात्र मुंबईच्या तुलनेत दिल्ली अधिक अडचणीत दिसत आहे.

मुंबई, दिल्लीची स्थिती कशी?

दिल्लीच्या संघाला अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र आजचा सामना मुंबईत होत असून मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासहीत जोरदार पाऊस झाला. मुंबईतही जोरदार पावसाने हजेरी लावली. आजही मुंबईत संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पाऊस कायम राहिल्यास आजच्या सामन्याचा निकाल लागणार नाही. ही बाब दिल्लीसाठी जास्त चिंतेची आहे.

सामना झालाच नाही तर…

मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अॅक्यू वेदरनुसार मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता अधिक असून संध्याकाळी दीड तासामध्ये सर्वाधिक पाऊस पडेल. मात्र रात्री पावसाची शक्यता कमी आहे. आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर ती मुंबईसाठी आनंदाची बातमी ठरेल. कारण सामना रद्द झाला तर गुण वाटून दिले जातील. मुंबईचा संघ आधीपासूनच दिल्लीपेक्षा एका पॉइण्टने पुढे आहे. दोन्ही संघांना एक एक पॉइण्ट वाटून दिला तर मुंबईचे 15 आणि दिल्लीचे 14 पॉइण्ट्स होतील.

दोन्ही संघांचे शेवटचे सामने एकाच संघाविरुद्ध

दिल्ली आणि मुंबई आपआपले लीग स्टेजमधील अंतीम सामने पंजाबविरुद्ध खेळणार आहेत. पंजाबचा संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे आज मुंबई विरुद्ध दिल्ली सामना झाला नाही. तर मुंबई आणि पंजाबच्या सामन्याच्या निकालावर मुंबई पुढे जाणार की दिल्ली हे निश्चित होईल. मुंबई पंजाबविरुद्ध जिंकली तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडले.

दिल्लीला असलेली एकमेव संधी म्हणजे…

दिल्लीला आजचा सामना रद्द झाल्यानंतरही पात्र ठरायचं असेल तर काही गोष्टी घडणं आवश्यक आहे. साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना मुंबईने गमावला तर दिल्ली प्लेऑफमध्ये जाईल. मात्र यासाठी आज अगदी कमी षटकांचा सामना झाला तरी त्याचा निर्णय लागला पाहिजे आणि दोन पॉइण्ट दिल्लीला मिळाले पाहिजेत ही अट कायम राहील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!