Homeमनोरंजनजगातील सर्वात उंच खेळाडूची IPL मध्ये एन्ट्री, प्लेऑफमध्ये RCBचा मास्टरस्ट्रोक, बाबर झालाय...

जगातील सर्वात उंच खेळाडूची IPL मध्ये एन्ट्री, प्लेऑफमध्ये RCBचा मास्टरस्ट्रोक, बाबर झालाय 5 वेळा गिऱ्हाइक!


जगातील सर्वात उंच खेळाडू: विराट कोहलीची आरसीबी टीम आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. अशातच आरसीबीने एक मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी टीममध्ये अशा खेळाडूला आणलंय ज्याची गणना जगातील सर्वात उंच खेळाडूंमध्ये केली जाते.  ब्लेसिंग मुजरबानी असे त्याचे नाव आहे. 28 वर्षीय मुजरबानी हा झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज आहे आणि तो आरसीबीकडून आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी आलाय. आरसीबीने त्याला लुंगी एनगिडीच्या जागी घेतले आहे.

मुजरबानीची उंची किती?

ब्लेसिंग मुजरबानीची उंची 6 फूट 8 इंच असल्याचे सांगितले जाते. आता यानुसार तो मार्को जॅन्सनइतका उंच आहे. त्याची उंचीही 6 फूट 8 इंच आहे. त्यामुळे हे दोघेही सध्याच्या क्रिकेटमधील सर्वात उंच खेळाडू आहेत. ब्लेसिंग मुजरबानी हा आरसीबीमधून खेळतोय. ब्लेसिंग हा असा वेगवान गोलंदाज आहे ज्याच्यासमोर पाकिस्तानचा सर्वात मोठा फलंदाज बाबर आझम देखील क्रिकेटच्या मैदानावर थरथर कापतो. त्याने बाबर आझमला आतापर्यंत 5 वेळा आऊट केलंय.

मुजरबानी घेईल लुंगी एनगिडीची जागा

मुजरबानी आणि बाबर आझमची कहाणी काय आहे ते जाणून घेऊया. प्रथम त्याने लुंगी न्गिडीची जागा का घेतली ते समजून घेऊया. कारण WTC फायनल पाहता दक्षिण आफ्रिकेने 26 मे पर्यंत आयपीएलमधून आपल्या सर्व खेळाडूंना परत बोलावलंय. लुंगी न्गिडी हा दक्षिण आफ्रिकेचा एक प्रमुख गोलंदाज देखील आहे. जो WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्या संघाचा एक महत्त्वाचा चेहरा असेल.

असे असले तरी लुंगी एनगिडी आरसीबीकडून त्याचा पुढचा सामना खेळेल. हा सामना 23 तारखेला बेंगळुरूमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. याचा अर्थ असा की मुजरबानी पुढील सामन्यात आरसीबीकडून खेळताना दिसणार नाही. पण त्यानंतर आरसीबी शेवटच्या ग्रुप टप्प्यातील सामन्यात आणि नंतर प्लेऑफमध्ये त्याचा फायदा करुन घेऊ शकते.

मुजरबानीने बाबर आझमला 5 वेळा बाद केलंय

6 फूट 8 इंच उंचीच्या ब्लेसिंग मुझारबानीसमोर पाकिस्तानचा महान फलंदाज बाबर आझमचे पाय कसे थरथरतात हेपण आता जाणून घ्या. आतापर्यंत मुजराबानीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबरला 5 वेळा बाद केलंय. जे त्याच्या वर्चस्वाचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो. या काळात बाबर आझमने त्याच्याविरुद्ध 105 चेंडूत 21.20 च्या अगदी सामान्य सरासरीने अवघ्या 106 धावा केल्यायत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चतुर्थी व्रत आज:भगवान गणेश, महालक्ष्मीसोबत करा आणि शुक्र ग्रहाची पूजा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा,...

0
आज आषाढ कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत केले जाते. शुक्रवारी चतुर्थी तिथी असल्याने याचे महत्त्व आणखी...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत...

0
श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार,...

अनंत अंबानींनी धीरेंद्र शास्त्रींचा हात पकडून ओढले, व्हिडिओ:बागेश्वर धाममध्ये म्हणाले- तुम्ही यायला सांगितले होते,...

0
देशातील प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने बागेश्वर धाम येथे पोहोचले. फोटो सेशनदरम्यान एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. फोटो काढताना अनंत...
spot_img

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...
error: Content is protected !!