Homeमनोरंजन25 वर्षांचा महिंदरा बोलेरो आणि बोलेरो निओ बोल्डचा नवीन देखावा किंमत तपशील...

25 वर्षांचा महिंदरा बोलेरो आणि बोलेरो निओ बोल्डचा नवीन देखावा किंमत तपशील तपशील पहा


महिंद्रा बोलेरो बोल्ड एडिशन नवीन लुक: सैन्यदल असो किंवा सामान्यांची वाहन पसंती, महिंद्राच्या वाहनांना कायमच कारप्रेमींकडून प्राधान्य मिळतं. अगदी कैक वर्षं मागे वळून पाहिलं तरीसुद्धा महिंद्राच्या वाहनांनी कायमच अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर आणि तितकाच यशस्वी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं आहे. आजवर या कंपनीच्या बऱ्याच कार मायलेज आणि लूकसाठी नावाजल्या गेल्या. त्यातलंच एक नाव म्हणजे बोलेरो. जवळपास 25 वर्षांपूर्वी लाँच झालेल्या या जबरदस्त कारचं नवं एडिशन कंपनीनं नुकतंच लाँच केलं आहे. बोलेरोच्या नव्या एडिशनला कंपनीनं बोल्ड एडिशन असं नाव दिलं असून, बोलेरो बोल्ड आणि बोलेरो निओ बोल्डमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळं ही कार कमाल अनुभव देत आहे.

Mahindra Bolero Bold मध्ये नेमकं खास काय?

Mahindra Bolero Bold या कारच्या नव्या एडिशनमध्ये एक्सटिरीअर आणि इंटेरिअर अॅक्सेसरीज बदलण्यात आल्या आहेत. कारच्या एक्सटेरिअरचं म्हणावं तर, यामध्ये ब्लॅक बपर्सवर गडद रंगाचं क्रोम एलिमेंट दिसतं. याशिवाय कारच्या केबिनमध्ये नवे काळ्या रंगाचे सीट कवर देण्यात आले आहेत. ज्यामुळं कारच्या बेज रंगावर ते कमाल दिसत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार कारच्या स्डँडर्ड व्हेरिएंटपेक्षा या पॅकेजसाठी साधारण 30000 रुपये जास्तीची किंमत मोजावी लागू शकते.

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या कारच्या एडिशनमध्ये कोणताही मॅकेनिकल बदल करण्यात आलेला नाही. ज्यामुळं आधीप्रमाणेच कारला 1.5 लीटर थ्री सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आलं असून, त्यातून 75bhp पॉवर आणि 210 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट होतो. कारच्या इंजिनला मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स जोडण्यात आला असून, त्यामुळं रिअर व्हीलला पॉवर मिळते.

कारच्या महत्त्वाच्या फिचर्सविषयी सांगावं तर त्यात डार्क क्रोम एक्सटीरिअर, स्पोर्ट ब्लॅक फ्रंट बंपर, प्रिमियम ब्लॅक इंटेरिअर, रुफ रेल (बोलेरो निओ), रिअर व्ह्यू कॅमेरा (बोलेरो निओ) देण्यात आला आहे.

बोलेरो कार नव्हे, विश्वास!

आता महिंद्राची कार म्हटली, की तिथं विश्वासार्हता आलीच आणि बोलेरोसुद्धा इथं अपवाद नाही. गेल्या 25 वर्षांपासून ही कार भारतात उत्तम कामगिरी करत असून, पॉवर आणि परफॉर्मन्समुळं भारताबाहेरही तिला चांगली मागणी आहे. भारतात फक्त शहरी भागच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा आणि विशेषत: ऑफरोडिंगसाठी बोलेरोला कारप्रेमींची निर्विवाद पसंती मिळते. 2000 मध्ये लाँच करण्यात आलेल्या या कारमध्ये मागील 25 वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. जून 2021  मध्ये या कारचं बोलेरो निओ हे प्रिमियम वर्जन लाँच झालं. राहिला प्रश्न किमतीचा तर, बोलेरोचं क्लासिक मॉडेल 9.79 लाख रुपयांना उपलब्ध आहे तर, बोलेरो निओसाठी 9.95 लाख रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळं किमतीसह परफॉर्मन्सच्या बाबतीत ही कार पैसा वसूल आहे, असंच अनेकजण म्हणत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
spot_img

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!