Homeदेश-विदेशसुवर्ण मंदिरावरील पाकिस्तानच्या पाकिस्तानचा हल्ला अमृतसर इंडियन आर्मीने व्हिडिओ ऑपरेशन सिंदूर उघडकीस...

सुवर्ण मंदिरावरील पाकिस्तानच्या पाकिस्तानचा हल्ला अमृतसर इंडियन आर्मीने व्हिडिओ ऑपरेशन सिंदूर उघडकीस आणले


भारत पाकिस्तान तणाव: पहलगाम हल्ल्याची (Pahalgam Terror Attack) व्याजासहित परतफेड करण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त (PoK) काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. पण भारताच्या या हल्यानं थयथयाट करणाऱ्या पाकिस्ताननं तरीसुद्धा आपल्या खुरावती थांबवल्या नाहीत. किंबहुना ऑपरेशन सिंदूरआधीसुद्धा पाकिस्तान या- न त्या मार्गानं भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्याच प्रयत्नांत दिसून आला. नुकताच त्यासंदर्भातील एक मोठा खुलासा सैन्यदलाच्याच वतीनं करण्यात आला.

सैन्याच्या माहितीनुसार भारतानं पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावला. उपलब्ध माहितीनुसार पाकिस्तानच्या निशाण्यावर अमृतसरचं सुवर्णमंदिर होतं. 6 आणि 7 मे रोजी पाक सैन्यानं सुवर्णमंदिराला लक्ष्य करत तिथं हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र भारतीय सैन्यानं हा डाव उधळून लावला. भारतीय सैन्यानं आकाश क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे हा कट उधळला. इतकंच नव्हे, तर यादरम्यान पाकिस्तानी क्षेपणास्त्रही पाडल्याची माहिती उघड करण्यात आली.

दहशतादाला खतपाणी देणारा आणि दहशतवाद्यांना आसरा देणारा पाकिस्तान 6 आणि 7 मे रोजी जम्मू काश्मीर, गुजरात आणि पंजाबमधील काही शहरांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता किंबहुना तसे प्रयत्नही झाले. मात्र भारतीय लष्करानं हे सर्व मनसुबे उधळून लावले. नुकतंच भारतीय सैन्यदलानं अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि इतर शहरांवरील हल्ले कसे परतवून लावले याची सविस्तर माहिती देत पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांना कशा पद्धतीनं मातीमोल केलं हेसुद्धा दाखवून दिलं.

भारतीय सैन्यानं अचूक तर्क लावत हेरला पाकचा कावेबाजपणा

15 इन्फेंट्री डिवीजनटे जीओसी मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार ‘पाकिस्तानी सैन्यानं काही लक्ष्य निश्चित केलं नसतानाही भारतीय सैन्यानं अचूक तर्क लावत सैन्यतळ आणि धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवली. यामध्ये सुवर्णमंदिर अतिशय महत्त्वाचं धार्मिक स्थळ ठरलं. ज्यामुलं सुवर्ण मंदिराला पूर्णत: हवाई सुरक्षा कवच देण्याच्या हेतूनं आम्ही अत्याधुनिक शस्त्रांची व्यवस्था केली. 8 मे रोजी पहाट होतच होती तितक्यात पाकिस्तानच्या दिशेनं मानवरहित हवाई हल्ला होत असल्याचं लक्षात आलं. यामध्ये मुख्यत्वे ड्रोन आणि लांबवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.’

शेषाद्री यांच्या माहितीनुसार या हल्ल्यासाठी, तो परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज होतं. कारण, या हल्ल्याची कुणकुण इथं सैन्याला होतीच. आपल्या उत्तमोत्तम सैनिकांनी आणि एअर डिफेंन्स गनर्सनी पाकिस्तानचे हे नापाक मनसुबे उधळून लावले आणि सुवर्ण मंदिरावरील हल्ले परतवून लावले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम | जून 17 अद्यतने25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या...

17 जूनचे राशीभविष्य:सिंह, मीन राशीच्या लोकांना पदोन्नतीची संधी; कर्क, मकर राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...

0
बुधवार, 17 जून रोजी कर्क राशीच्या लोकांना बऱ्याच काळापासून थांबलेली देयके मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आणि...

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

0
शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट...
spot_img

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...
error: Content is protected !!