Homeदेश-विदेशViral News : लिव्ह - इन रिलेशनशिपमध्ये राहिला, मुलं झाली; आता एकाच...

Viral News : लिव्ह – इन रिलेशनशिपमध्ये राहिला, मुलं झाली; आता एकाच मंडपात 2 महिलांशी करणार लग्न, नेमकं काय आहे प्रकरण?


व्हायरल न्यूज: सोशल मीडियावर एका लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण हे लग्न एक वधू एक वर असं नाही तर एकाच मंडपात एका वराचं दोन वधूशी लग्न होणार आहे. हे लग्न होतं गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वासदा तालुक्यातील खानपूर गावात….ही एक आश्चर्यकारक आणि विचित्र लग्नाची गोष्ट आहे. वराचं नाव मेघराजभाई देशमुख असून तो 36 वर्षीय हा सोमवारी 19 मे रोजी एकाच मंडपात तो दोन महिलांशी लग्न करणार आहे, ज्याचे निमंत्रण पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कारण त्यावर दोन वधूंची नावे छापलेली आहेत.

मेघराजभाई हे फलिया परिसरातील रहिवासी आहेत. त्यांना पहिल्यांदा खांडा गावातील काजल गावित यांच्यावर प्रेम झाले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांचं लग्न झालं. काही वर्षांनी त्यांना केलिया गावातील रेखाबेन गेन यांच्यावर प्रेम झालं आणि 2013 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर ते दोन्ही महिलांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला.

या काळात त्यांना काजलपासून दोन मुलं आणि रेखापासून एक मुलगा झाला. आता दोन्ही कुटुंबांनी हे नाते स्वीकारले आहे. मेघराजभाई एकाच मंडपात या दोन्ही महिलांशी लग्न करत आहे. हे अनोखे लग्न संपूर्ण विधींसह पार पडणार आहे आणि लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे अनोखे लग्न आदिवासी समुदायाच्या पारंपारिक विधीशी संबंधित आहे. ज्याला “चांदला विधी” किंवा “फुलहार” म्हणतात. या परंपरेनुसार, तरुण आणि तरुणी लग्नापूर्वी पती-पत्नीसारखे एकत्र राहू शकतात. जेव्हा ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, तेव्हा ते समाज आणि धर्माच्या रीतिरिवाजांनुसार लग्न करतात. मेघराजभाई, त्याच परंपरेचे पालन करणार आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही महिलांसोबत एकाच घरात राहत होता आणि आता तो त्यांचं नातं अधिकृत करणार आहेत.

जेव्हा या लग्नाची निमंत्रण पत्रिका बाहेर आली तेव्हा वरासह दोन वधूंची नावे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे कार्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. काही लोक याला खऱ्या आणि प्रामाणिक नात्याचे उदाहरण मानत जातं आहे. तर अनेकांना या अनोख्या परंपरेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मेघराजभाईंना केवळ वांसदाहूनच नाही तर संपूर्ण गुजरातमधून शुभेच्छा आणि फोन येत आहेत. त्यांचे लग्न आता “व्हायरल लग्न” झालं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम | जून 17 अद्यतने25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या...

17 जूनचे राशीभविष्य:सिंह, मीन राशीच्या लोकांना पदोन्नतीची संधी; कर्क, मकर राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...

0
बुधवार, 17 जून रोजी कर्क राशीच्या लोकांना बऱ्याच काळापासून थांबलेली देयके मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आणि...

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

0
शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट...
spot_img

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...
error: Content is protected !!