Homeदेश-विदेश200 Passengers 'Fly Without A Pilot' For 10 Minutes from Frankfurt to...

200 Passengers ‘Fly Without A Pilot’ For 10 Minutes from Frankfurt to Seville, Spain know what happened next | विमानात 200 प्रवासी अन् अचानक बेशुद्ध पडला पायलट, पुढे काय झालं? जाणून घ्या


पायलटशिवाय लुफ्थांसा विमान उडते: विमान चालवणे हे गाडी किंवा बाईक चालवण्याएवढे सोपे काम नाही. याशिवाय विमान चालवताना एक छोटी चूक घडली तरी शेकडो लोकांचे प्राण त्यात जाऊ शकतात. कोणतेही वाहन चालवताना चालकाच्या छोट्याशा चुकीमुळे अनेक अपघात होतात. आज आम्ही तुम्ही अशी एक बातमी सांगणार आहोत जी वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. जर्मनीहून स्पेनला जाणारे एक विमान पायलटशिवाय 10 मिनिटे हवेत उडत राहिले. ज्या वेळी हे घडले तेव्हा विमानात 200 प्रवासी होते. याशिवाय जर्मन वृत्तसंस्था डीपीएने शनिवारी वृत्त दिले सांगितले की, त्या विमानाचा सह-वैमानिक बेशुद्ध पडला होता.

नक्की काय झालं?

17 फेब्रुवारी 2024 रोजी फ्रँकफर्टहून सेव्हिल, स्पेनला जाणाऱ्या विमानादरम्यान एक घटना घडली. अहवालानुसार, लुफ्थांसाचे एअरबस ए321 हे विमान 10 मिनिटे पायलटशिवाय उडाले कारण पहिला अधिकारी (फस्ट ऑफिसर) बेशुद्ध पडला होता आणि कॅप्टन वॉशरूममध्ये होता. जेव्हा कॅप्टन वॉशरूम वापरून कॉकपिटमध्ये परत येण्यासाठी आला तेव्हा त्याला आतमध्ये जातच आले नाही. तो त्यावेळी सुरक्षा दरवाजासाठी प्रवेश कोड टाकत होता. त्यावेळी कॅप्टन घाबरला आणि त्याने इंटरकॉमद्वारे कॉकपिटमध्ये फोन केला, पण त्याला काहीही उत्तर मिळाले नाही. यानंतर कॅप्टनने गेट उघडण्यासाठी इमर्जन्सी कोड टाकला. यावेळी सह-वैमानिक शुद्धीवर आला आणि त्याने आतून स्वतः दरवाजा उघडला. त्यावेळी सह-वैमानिक लाल पडला होता. याशिवाय त्याला घाम फुटला होता आणि तो अस्ताव्यस्त हालचाल करत होता. हे बघून लगेचच कॅप्टनने केबिन क्रूला मदत मागितली. त्यानंतर कॅप्टनने माद्रिदमध्ये अनियोजित लँडिंग करण्याचा निर्णय घेतला, आणि या  पायलटला  रुग्णालयात नेण्यात आले.

हे ही वाचा: पायलटला आकाशात मार्ग कसा समजतो? जाणून घ्या

अहवालानुसार, 199 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स असलेले हे विमान सुमारे 10 मिनिटे विमानाच्या कमांडिंगमध्ये असलेल्या पायलटशिवाय उड्डाण करत होते.

10 मिनिटे पायलटशिवाय कसं उडाले विमान?

जेव्हा पहिला अधिकारी शिवाय विमान 10 मिनिटे उडत होते तेव्हा कोणतीही वाईट घटना नाही घडली. याचे कारण होते ऑटोपायलट. ऑटोपायलट मोड सुरु असल्यामुळे विमान स्थिरपणे उड्डाण करत राहू शकले. या कालावधीत, व्हॉइस रेकॉर्डरने कॉकपिटमध्ये विचित्र आवाज रेकॉर्ड केले जे त्याच्या आरोग्याशी निगडित होते, असे डीपीएने माहिती दिली.

हे ही वाचा: गावातलं ग्रीन वंडर! बाभळीच्या झाडावर उभारलेलं अनोखं ट्री हाऊस, आतील दृश्य पाहून चाटच पडाल

नक्की काय झाले होते?

स्पॅनिश विमान वाहतूक तपासकर्त्यांच्या अहवालात असे दिसून आले आहे की सह-वैमानिकाला  हृदयविकाराचा त्रास होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यानंतर त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम | जून 17 अद्यतने25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या...

17 जूनचे राशीभविष्य:सिंह, मीन राशीच्या लोकांना पदोन्नतीची संधी; कर्क, मकर राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...

0
बुधवार, 17 जून रोजी कर्क राशीच्या लोकांना बऱ्याच काळापासून थांबलेली देयके मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आणि...

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

0
शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट...
spot_img

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...
error: Content is protected !!