Homeमनोरंजनआयपीएल 2025 आरसीबी पिठ

आयपीएल 2025 आरसीबी पिठ


आयपीएल 2025 पाऊस व्हिडिओ: एका आठवड्याच्या स्थगितीनंतर इंडियन प्रिमिअर लीगला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. आज बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट राडयर्सदरम्यान हा सामना होणार आहे. या सामन्याचा निकाल लागणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे ती बंगळुरुमधील वातावरणामुळे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. पण सामन्याचं टेन्शन घेण्याऐवजी आरसीबीच्या संघातील एक खेळाडू आणि विराटचा सहकारी या सराव बुडाला म्हणून निराश होण्याऐवजी चक्क अंडरपॅण्टवरच मैदानात धावत आला आणि मैदानात साचलेल्या पाण्यामध्ये स्विमींग करु लागला.

पाऊस आला खेळाडू पळाले पण…

मागील काही दिवसांपासून चिन्नास्वामी मैदानात दोन्ही संघांचे खेळाडू सराव करत असले तरी अनेकदा या सरावामध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे. पाऊस आला की सराव करणारे खेळाडू पव्हेलियनकडे धावायचे. हा जणून इथला दिनक्रमच झाला होता. मात्र रोजच्या या धावपळीला कंटाळून आरसीबीच्या संघातील एक खेळाडू चक्क केवळ अंडरपँटवरच मैदानात पावसाचा आनंद घेताना दिसला. या खेळाडूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पव्हेलियनमधून इतर सहकारीही या खेळाडूच्या पावसातील स्विमिंगच्या आनंदात दुरुनच सहभागी झाले.

कोण आहे हा खेळाडू?

ज्या खेळाडूने अंडरपँटवरच मैदानात धाव घेतली त्याचं नाव आहे, टीम डेव्हिड! आपल्या जबदस्त फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूमधील मुलं मैदानात साचलेलं पावसाचं पाणी पाहून जागं झालं की काय असं सर्वांना वाटू लागलं. मैदानातील खेळपट्टीजवळ टाकलेल्या कव्हर्सवर साचलेल्या पाण्यात टीम डेव्हिड अगदी वॉटरपार्कमधील घसरगुंडीवरुन घसरावं तसा घसरत, उड्या मारत पावसाचा आनंद घेत होता. त्याला मैदानात भिजताना पाहून अनेक खेळाडू ड्रेसिंग रुममधून त्याच्या धम्माल मस्तीचा आनंद घेत होते. जेव्हा टीम डेव्हिड ड्रेसिंग रुममध्ये परतला तेव्हा सर्वच सहकारी त्याच्यावर हसत होते. अनेकांनी आरडाओरड करुन त्याचं स्वागत केलं. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

मुंबईने सोडलं; पठ्ठ्यानं बंगळुरु गाजवलं

मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेला टीम डेव्हिड यंदाचं म्हणजेच आयपीएलचं 18 वं पर्व आरसीबीकडून खेळत आहे. 2024 मध्ये टीम डेव्हिडने मुंबईसाठी 241 धावा केल्यानंतरही त्याला संघात कायम ठेवण्यात आलं नाही. आरसीबीने त्याला 3 कोटींना करारबद्ध केलं. त्याने संघ मालकांचे पैसे वसूल केले आहेत. 11 सामन्यामध्ये त्याने 186 दावा केल्या आहेत. त्याची सरासरी 93 ची असून स्ट्राइक रेट 194 चा आहे. हा 29 वर्षीय खेळाडू आरसीबीसाठी यंदाच्या पर्वात विश्वासू फिनिशर ठरत आहे. त्याने बंगळुरुमध्येच यंदाच्या पर्वात पंजाबविरुद्ध केलेल्या नाबाद 50 धावा त्याच्या या पर्वातील सर्वोत्तम खेळीत गणली जाते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जपानच्या PM ताकाइची राष्ट्रपती भवनात पोहोचल्या:गार्ड ऑफ ऑनरने स्वागत; आज मोदींसोबत गुंतवणूक आणि सुरक्षा...

0
जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांचे गुरुवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. पंतप्रधान...

जीवनातील समस्यांमुळे एक व्यक्ती निराश झाला होता:प्रेरक कथा: दुःखी व्यक्ती संतांकडे पोहोचला, जाणून घ्या...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे, एक व्यक्ती आयुष्यातील अडचणींमुळे निराश झाला होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या...

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

0
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ...
spot_img

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...
error: Content is protected !!