Homeदेश-विदेशनरकटला स्वर्ग पुस्तक संजय राऊत यांनी उधव ठाकरे लीड महा विकास अगाडी...

नरकटला स्वर्ग पुस्तक संजय राऊत यांनी उधव ठाकरे लीड महा विकास अगाडी सरकारला तुरुंगवासाच्या मुदतीबद्दल चेतावणी दिली.


महा विकास भाजपाने संजय राऊतला अर्पण केले: राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने धमकावलं होतं. यासंदर्भातील गौप्यस्फोट स्वत: राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे. “सरकार पाडायला मदत करा अन्यथा तुरूंगात जाल,” अशी धमकी संजय राऊत यांना त्यांच्या दिल्लीत निवासस्थानी जाऊन एका भाजपा नेत्याने दिल्याचा संपूर्ण घटनाक्रम राऊतांनी पुस्तकामध्ये सांगितला आहे. नेमकं राऊतांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दांमध्ये अगदी जसंच्या तसं…

“मी दिल्लीत असताना एके दिवशी रात्री नऊ वाजता भाजपा परिवारातील माझ्या हितचिंतकाचा फोन आला. ते म्हणाले, “भेटायला यायचं आहे. बरोबर कुणीतरी आहे. विषय महत्त्वाचा आहे.” “यायला हरकत नाही,” असे कळवताच माझे हितचिंतक मित्र आणि इतर तिघे जण 15, सफदरजंग लेनवर पोहोचले. चहापान करत दिल्लीतील घडामोडींवर गप्पा झाल्या. त्या काळी माझे हे हितचिंतक महाराष्ट्रातून दिल्लीत संघ परिवाराच्या संघटन कार्यासाठी मुक्कामास होते. वैचारिक मतभेद असतानाही आमच्यातले नाते कायम राहिले. “संजयजी, महाराष्ट्रातले सरकार हे अनैसर्गिक पद्धतीने सत्तेवर आले आणि ते फार काळ चालवता येणार नाही, असे दिल्लीतील आमच्या लोकांचे म्हणणे आहे,” त्या मित्राने बोलायला सुरुवात केली.”

“तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?”

“तुम्ही सुज्ञ आहात!”

“हे तुमच्याबरोबरचे कोण? आपण परिचय करु दिला नाही…” मी.

“हे संघ परिवारातील माझे सहकारी आहेत. महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.”

“लक्ष कोणावर?”

“खास करुन तुमच्यावर…”

“च्या?”

“सरकार आणण्यात तुमचा सहभाग आहे. आता हे सरकार घालवण्यासाठी तुमचंच सहकार्य हवं. या सरकारच्या पाठीशी उभे राहू नका.”

नक्की वाचा >> ”मातोश्री’च्या गेटवर घामाघूम…’, गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी अमित शाहांना कसं वाचवलं? राऊतांचा गौप्यस्फोट

“आता या सरकारशी माझा तसा संबंध नाही. सरकार मजबूत आहे आणि एकदा आलेली सत्ता सहसा कोणी सोडत नाही,” मी.

“तुम्ही आम्हाला मदत करू शकता.”

“कशी?”

“आम्ही शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावतोय. काम सुरु आहे. तुम्ही उगाच आडवे येऊ नका.”

“आमचे आमदार कशाला फुटतील?”

“फुटतील! तुम्ही गप्पा राहा. जमल्यास सामील व्हा. महाराष्ट्रात उलथापालथ होईल.”

“आम्ही सरकार वाचवू. मोठे बहुमत आहे. पक्षांतरविरोधी कायद्यात आमदारांची फूट बसणार नाही. विधानसभा अध्यक्ष जागेवरच निर्णय घेतील!”

“तुम्ही सगळे अंधारात आहात. मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतोय, शात राहा. नाहीतर ईडी, सीबीआय तुम्हाला थंड करेल. तशा हालचाली सुरू आहेत. तुम्ही एकटे पडाल! महाराष्ट्रातले सरकार पाडायला मदत करा, नाहीतर तुरुंगात जावे लागेल!”

“ही तर धमकी आहे,” मी.

“मी तुमचा हितचिंतक आहे म्हणून सावध करायला आलोय. काळजी घ्या!”

रात्री अकरा वाजता ‘हितचिंतक’ म्हणवून घेणारे निघून गेले. मी त्यानंतर अस्वस्थपणे बंगल्याच्या मागच्या बाजूला येरझाऱ्या घालू लागलो.

आज पुस्तकाचं प्रकाशन

राऊत यांनी लिहिलेल्या, ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज म्हणजेच, शनिवारी, 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात प्रकाशन पार पडणार आहे.  या कार्यक्रमाला शिवसेना पक्षध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

0
शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट...

गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...

0
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

0
मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!