HomeमनोरंजनApple पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना आयफोन उधव ठाकरे शिवसेना...

Apple पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना आयफोन उधव ठाकरे शिवसेना यांनी मोदी आणि भाजपला विचारले की यूएसए अध्यक्ष भारतावर का रागावले आहेत?


ट्रम्प का भारतावर रागावले आहेत: “अमेरिकेशी भारताचे संबंध नेमके काय आहेत, याचा खुलासा निदान परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांनी करायला हवा. प्रेसिडंट ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदी यांनी पाकिस्तानबरोबरचे युद्ध थांबवले व हातातोंडाशी आलेल्या पाकव्याप्त कश्मीरवर पाणी सोडले. अमेरिकेशी व्यापार करायचा असेल तर पाकिस्तानबरोबरचे युद्ध थांबवा, अशी भूमिका प्रेसिडंट ट्रम्प यांनी घेतली व आपण ती मान्य केली. तरीही व्यापाराच्या मुद्द्यांवर ट्रम्प यांनी भारताला दिलेला शब्द मोडला आहे,” असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. “अमेरिकेतील उद्योगपती भारतात गुंतवणूक करू इच्छितात. त्यांना ट्रम्प यांनी मागे खेचले आहे. भारतात गुंतवणूक करण्याची गरज नसल्याचे ट्रम्प यांनी उद्योगपतींना सांगितले. हा भारतावर आर्थिक बॉम्बहल्ला आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्याचा मार्ग मोदींनी मोकळा केला

“‘अ‍ॅपल’ने आपल्या स्मार्ट फोनचे भारतातील उत्पादन थांबवावे आणि ते अमेरिकेत सुरू करावे अशी सूचना ट्रम्प यांनी ‘अ‍ॅपल’कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली. ट्रम्प हे आखाती राष्ट्रांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या सूचना केल्या. ट्रम्प यांचे हे वागणे बरे नाही. मोदी हे त्यांचे ‘अरे-तुरे’वाले मित्र आहेत. ट्रम्प यांनी निवडणुकीत विजयी व्हावे म्हणून मोदी यांनी भव्य प्रचार सभा अहमदाबादेत व अमेरिकेत घेतल्या (तेव्हा ट्रम्प यांचा पराभव झाला) व आता तर ट्रम्प यांचे ऐकून मोदी यांनी पाकिस्तानबरोबर युद्धविराम केला. ट्रम्प यांच्यामुळे दोन देशांतील अणुयुद्ध टळले व शांतता नांदू लागली. त्यामुळे प्रेसिडंट ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्याचा मार्ग पंतप्रधान मोदी यांनी मोकळा केला. हे इतके करूनही ट्रम्प यांनी भारतात येणारी परकीय गुंतवणूक रोखावी हे बरे नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

प्रत्यक्षात महाराष्ट्रात काहीच येत नाही व मोठे आकडे कागदावरच राहतात

“‘अ‍ॅपल’ ही भारतात सर्वाधिक रोजगार निर्माण करणारी कंपनी आहे. ‘अ‍ॅपल’मुळे देशभरात दोन लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. भारत व अमेरिकेदरम्यान 550 बिलियन डॉलर्सचा व्यापार आहे. अमेरिका भारताचा पहिल्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार असलेला देश आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करार साधारण 250 अब्ज डॉलर्सचा आहे, तर चीनसोबतचा व्यापार 120 अब्ज डॉलर्सचा आहे. हे लक्षात घेतले तर व्यापार बंद करण्याच्या धमकीमुळे युद्धबंदी का स्वीकारली, हे सहज लक्षात येईल. आयात-निर्यात वेगळे व ‘अ‍ॅपल’सारख्या कंपन्यांनी प्रत्यक्ष भारतात येऊन स्वतःची उत्पादने निर्माण करणे वेगळे. ‘अ‍ॅपल’सारख्या मोठ्या कंपन्या भारतात स्वतःची उत्पादने निर्माण करीत आहेत व ‘अ‍ॅपल’ने भारतातला गाशा गुंडाळून अमेरिकेला यावे अशी इच्छा प्रेसिडंट ट्रम्प यांनी व्यक्त केली. ‘अ‍ॅपल’कडून भारतात आयफोनची निर्मिती केली जाते. जगभरातील एकूण आयफोन उत्पादनापैकी 15 टक्के उत्पादन भारतात होते. मागच्या आर्थिक वर्षात ‘अ‍ॅपल’ने दीड लाख कोटी रुपयांची उलाढाल भारतात केली. अशा जास्तीत जास्त कंपन्या भारतात यायला हव्यात. महाराष्ट्राचे सरकार प्रत्येक वर्षी अमेरिकेत जाऊन तेथील गुंतवणूक यावी यासाठी दौरे करते व जत्रा भरवते. महाराष्ट्रात अमेरिकेतून किती गुंतवणूक येत आहे, याचे भलेमोठे आकडे जाहीर करते. प्रत्यक्षात महाराष्ट्रात काहीच येत नाही व मोठे आकडे कागदावरच राहतात,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

या घडामोडींवर भारताने साधा निषेधही व्यक्त केला नाही

“‘अ‍ॅपल’चे तसे नाही. ‘अ‍ॅपल’ला भारताच्या लोकसंख्येने आणि बाजारपेठेने आकर्षित केले. भारताची 140 कोटी लोकसंख्या ही सगळ्यात मोठी जागतिक बाजारपेठ आहे. या लोकसंख्येचा व्यापारी फायदा करून घेण्यासाठी कंपन्या धडपडत असतात. प्रेसिडंट ट्रम्प यांनी उद्योग-व्यापाराबाबत भारताची आर्थिक कोंडी करायचे ठरवले असेल तर भारत त्यांच्याशी कसा सामना करणार? ट्रम्प यांची भाषा अरेरावीची आहे. भारतात उत्पादन करण्याची गरज नाही. त्यांचे ते बघून घेतील. त्यांचे हितसंबंध त्यांना सांभाळू द्या, असे प्रेसिडंट ट्रम्प यांनी उघडपणे बोलणे हे भारताविषयी त्यांच्या मनात चांगल्या भावना नसल्याचे लक्षण आहे. ट्रम्प व मोदी यांच्यात काय बिनसले आहे की, त्यांनी भारताशी हा असा डाव मांडला आहे? दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्या प्रेसिडंट ट्रम्प यांनी शेकडो भारतीयांना घुसखोर ठरवून, त्यांना हातापायांत बेड्या घालून लष्करी विमानाने भारतात पाठवले. इतर देशांच्या घुसखोरांबाबत त्यांनी ही अमानुषता दाखवली नाही. भारताचे घुसखोर परत पाठवल्यावर त्यांनी ती मोहीम थांबवली. म्हणजे भारतीयांना अमेरिकेतून हाकलणे हाच त्यांचा हेतू होता व या घडामोडींवर भारताने साधा निषेधही व्यक्त केला नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

ट्रम्प भारतावर का पिसाटले आहेत?

“प्रेसिडंट ट्रम्प यांना भाजपची मंडळी टरकते असेच लोकांना वाटते. भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी ट्रम्प यांच्या आगाऊपणाबद्दल त्यांच्या एक्स अकाऊंटवर मत व्यक्त करताच भाजपचे सर्वांग घामाने भिजले व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी खासदार राणावत यांना ती ‘पोस्ट’ रद्द करायला लावली. प्रेसिडंट ट्रम्प यांचे इतके भय भाजप व त्यांच्या नेत्यांना का वाटावे? ट्रम्प यांच्याकडे भाजप नेत्यांची व सत्ताधाऱ्यांची कोणती रहस्ये आहेत, ज्यामुळे ट्रम्प यांच्या बाबतीत आपण बोटचेपे धोरण स्वीकारले आहे. प्रेसिडंट ट्रम्प यांनी ‘अ‍ॅपल’सारख्या कंपन्यांना भारतातून बाहेर काढणे म्हणजे आमच्या पोटावर लाथ मारण्याचाच प्रकार नाही काय? ट्रम्प भारतावर का पिसाटले आहेत? जरा कळू द्या,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!