Homeमहाराष्ट्रशिवसेना संजय राऊत म्हणतात की मी तुरूंगात असताना एमएनएसचे प्रमुख राज ठाकरे...

शिवसेना संजय राऊत म्हणतात की मी तुरूंगात असताना एमएनएसचे प्रमुख राज ठाकरे यांनी बोलावले पाहिजे


राज ठाकरे वर संजय राऊत: शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंबद्दल आपल्या मनातील एक सल बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं ते म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या विधानावर आता राज ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागणार आहे.

– राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी मैत्रीचे संबंध राहिले होते. परंतु त्यांनी बाळासाहेबांची साथ सोडून मनसेची स्थापना केल्यावर अनेकांसोबतचे मैत्रीचे संबंध दुरावले. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबतीतही तेच घडले. एकाच पक्षात असताना मैत्री होती,परंतु नंतर राजकारणात दोघांनीही एकमेकांवर टिकेचे प्रहार केले. तरीही त्यांच्यातील जिव्हाळा कायम होता. त्यामुळंच संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून ती सल बोलून दाखवली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, ‘संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!’ खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नात कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही,” असं संजय राऊत म्हणला आहेत.

‘ईडी अटकेच्या भीतीनं वायकर मातोश्रीवर रडले’

तुरूंगात जाण्याइतके माझ्यात बळ नाही. मला अटॅक येवून मी मरेन किंवा मला आत्महत्या तरी करावी लागेल असं हतबल होऊन रविंद्र वायकर बोलल्याचं संजय राऊतांनी आपल्या ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकात म्हटलं आहे. शिंदे गटाने दबाव टाकल्याने आणि भीतीने वायकर यांनी शिवसेना सोडल्याचा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केला आगे.

“वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता. वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते,” असं त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली. रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार, असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली आणि त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचे पुस्तकात म्हटलं गेलं. या पुस्तकात ईडीचा गैरवापर करून वायकर यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत...

0
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही....

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

0
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात...

भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमधील सिगारेट बॉक्सेसचा दावा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयराजस्थान बस अपघात : भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमध्ये सिगारेटच्या पेट्यांचा दावादौसा1 तासापूर्वीलिंक कॉपी कराराजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची...

1 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाच्या समस्येतून दिलासा मिळेल, नवीन सुरुवातीसाठी मकर राशीच्या लोकांना...

0
बुधवार, 1 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ...
spot_img

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
error: Content is protected !!