HomeमनोरंजनAamir Khan and Rajkumar Hirani : 11 वर्षानंतर आमिर आणि राजकुमार हिरानी...

Aamir Khan and Rajkumar Hirani : 11 वर्षानंतर आमिर आणि राजकुमार हिरानी एकत्र; सिनेसृष्टीतील ‘या’ मराठी दिग्गज व्यक्तीवर बनवणार बायोपिक


आमिर खान आणि राजकुमार हिरानी: ‘थ्री ईडियट्स’ आणि ‘पीके’ सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर आता चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खान आता तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. जवळपास 11 वर्षांनंतर आमिर आणइ राजकुमार हिरानी एकत्र येणार आहेत. हे दोघं भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर बायोपिक घेऊन येणार आहेत. आमिर आणि राजकुमारी हिरानी हे दोघं या चित्रपटावर आता काम करत आहेत. अजून या चित्रपटाचं नाव काही ठरलेलं नाही. मात्र, चित्रपटाचं शूटिंग हे ऑक्टोबर महिन्यात सुरु होऊ शकत आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’नं दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. चित्रपटात दाखवण्यात येणार आहे की दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटाचे जनक ही पदवी कशी मिळाली? तर याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. आमिर खानच्या टीमनं दिलेल्या स्टेटमेंटनुसार, 20 जून रोजी सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खान या चित्रपटाची तयारी सुरु करणार आहे. वीएफएक्स स्टूडियोजनं त्या काळाचे आणि पीरियेडचे एआय डिझाइन तयार केले आहेत.

या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चार वर्षांपासून काम होतंय. रिपोर्ट्सनुसार, “राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि आविष्कार भारद्वाज गेल्या 4 वर्षांपासून या स्क्रिप्टवर काम करत आहे. दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसालकर या प्रोजेक्टचे समर्थक राहिलेत आणि त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या आयुष्या संबंधातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.”

हेही वाचा : ‘महाभारत’ लिहिण्यासाठी बीआर चोप्रा यांनी मुस्लिम लेखकाची निवड का केली? स्वत: त्यांनीच केला होता खुलासा

दादासाहेब फाळके यांचा 1913 मध्ये प्रदर्शित झालेला ‘राजा हरिश्चंद्र’ पासून त्यांच्या सत्यवान-सावित्री पर्यंत अनेक चित्रपटांविषयी आपल्याला माहित आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी कोणाला जास्त काही माहित नाही. सगळ्यांना आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजकुमार हिरानी आणि आमिर खान यांच्या आधी ‘दादासाहेब फाळके’ यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याचा विचार कोणत्या दुसऱ्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या मनात आला की नाही याविषयी जास्त माहिती नाही. आता आमिर खान आणि राजकुमार हिरानी हे या चित्रपटातून दादासाहेब फाळके यांच्याविषयी कोणत्या गोष्टी दाखवणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

0
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात...

भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमधील सिगारेट बॉक्सेसचा दावा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयराजस्थान बस अपघात : भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमध्ये सिगारेटच्या पेट्यांचा दावादौसा1 तासापूर्वीलिंक कॉपी कराराजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची...

1 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाच्या समस्येतून दिलासा मिळेल, नवीन सुरुवातीसाठी मकर राशीच्या लोकांना...

0
बुधवार, 1 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ...

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...
spot_img

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
error: Content is protected !!