Homeदेश-विदेशव्हायरल न्यूज वर्ल्ड सर्वात महागड्या पार्टी 54 वर्षांपूर्वी आयोजित केली गेली होती...

व्हायरल न्यूज वर्ल्ड सर्वात महागड्या पार्टी 54 वर्षांपूर्वी आयोजित केली गेली होती किती पैशांचा तपशील किती खर्च केला आहे


जगातील सर्वात महाग पार्टी: पार्टी… फक्त नाव उच्चारलं तरीही अनेकांचाच उत्साह शिगेला पोहोचतो. अनेक पाहुणे, कमाल मेजवानी, नुसत्या गप्पा, नाच-गाणी आणि बरंच काही. असंच एकंदर पार्टीचं चित्र असतं. बरं, या पार्टीची किंवा कथित स्नेहभोजनाची कारणंही एकाहून एक सरस असतात. अशीच एक पार्टी जवळपास पाच दशकांपूर्वी पार पडली होती.

18 टन जेवण, मद्याच्या 25000 बाटल्या, पाहुण्यांची ने- आण करण्यासाठी 100 विमानं अशी एकंदर सोय असणारी ही पार्टी कोणा व्यावसायिकानं नव्हे, तर इराणच्या एका व्यक्तीन 1971 मध्ये आयोजित केली होती. आतापर्यंत ही जगातील सर्वात महागडी पार्टी ग्राह्य धरली जाते.

54 वर्षांपूर्वी इराणचं चित्र अगदी वेगळं होतं. इथं महिलांना पाश्चिमात्य कपडे घालण्याची परवानगी होती, अतिशय मॉडर्न लूकमध्ये वावरण्यास वाव दिला जात होता. मात्र 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीनं सारं चित्र बदललं. या क्रांतिमुळं पहलवी राजवंशाचा शेवट झाला (Pahlavi Dynasty) आणि इस्लामिक प्रजासत्ताक उदयास आलं आणि त्यामुळं देशातील नियम, संस्कृती आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडला.

इराणच्या इतिहासात डोकावताना…

1941 हा तोच काळ होता जेव्हा रजा शाह, हे इराणचे शासक झाले. श्रीमंतीच्या बळावर ते इराणलाही आधुनिकीकरणाच्या मुख्य प्रवाहात आणू इच्छित होते. त्यांनी कधी नव्हे ते पाश्चिमात्य राहणीमानाला प्राधान्य देत जुनाट रितीरिवाजांना बगल दिली होती, जाहीर विरोधही केला होता. 1971 मध्ये पर्शियन साम्राज्याला 2500 वर्षे पूर्ण झाल्याच्याच निमित्तानं एका जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.पर्सेपोलिसच्या वाळवंटीय भागात या पार्टीचं आयोजन करण्यात आलं जिथं प्राचीन राजा सायरस द ग्रेट यांची कबर होती. या पार्टीमध्ये 65 देश पाहुणे होते आणि त्या काळात या पार्टीसाठी तब्बल 100 मिलियन डॉलर इतका गडगंज खर्च करण्यात आला होता.

वर्षभर सुरू होती पार्टीची तयारी…

जवळपास वर्षभर या पार्टीची तयारी सुरू होती. पार्टीसाठी तेहरानमध्ये हॉटेलं कमी पडत होती, याचसाठी अनेक तंबू उभारून एका अस्थायी शहराची निर्मिती करण्यात आली. रस्त्ये तयार करण्यात आले. बरं हे तंबू एखाद्या शाही महालाहून कमी नव्हते. या पार्टीसाठी थेट फ्रान्सहून जेवण मागवण्यात आलं होतं. या पार्टीसाठी 40 ट्रक आणि 100 विमानं फक्त सामानाची ने- आण करण्यासाठी वापरली गेली होती. बरं, इतक्यावरच न थांबता जवळपास 50000 पक्षी आणत या वाळवंटाला एक समृद्ध भाग भासवलं जात होतं. वास्तवात मात्र येथील उष्णतेमुळं यातील बऱ्याच पक्ष्यांचा मृत्यू झाला.

हेसुद्धा वाचा : 1 लाख कोटींचं झाला Taj Hotel हा ब्रॅण्ड! 1903 मध्ये सहा रुपयला मिळणाऱ्या रुमचं आजचं भाडं…

पार्टीची जगभरात चर्चा, सामान्यांमध्ये मात्र संतापाची लाट…

18 जन जेवण, देशोदेशीचे पाहुणे आणि डोळे दीपवणारी व्यवस्था असं या पार्टीचं आयोजन असलं तरीही त्या काळात इराणमधील सामान्य जनता मात्र अनेक प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित होती. पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा त्यांच्यासाठी करता आली नव्हती. ज्यामुळं या पार्टीसाठी करण्यात आलेल्या शाही खर्चानं सामान्य नागरिकांचा संताप अनावर झाला होता. याच संतापासून शाह यांच्या सत्तेचा लोप सुरू ढाला आणि इथूनच इस्लामिक क्रांती उदयास आली, ज्यामुळं इराणचा इतिहास पुरता बदलला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...

0
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

0
मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!