Homeमनोरंजनऑटो न्यूज मारुती 5 स्टार सेफ्टी रेटिंग कार मारुती डीझायर किंमत वैशिष्ट्ये...

ऑटो न्यूज मारुती 5 स्टार सेफ्टी रेटिंग कार मारुती डीझायर किंमत वैशिष्ट्ये आणि मायलेज पुनर्विक्री मूल्य


ऑटो न्यूज मारुती कार: भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये बहुतांश कार कंपन्यांनी मागील दशकभराच्या काळात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित कारचे बहुविध मॉडेल सादर केले. त्यात सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या कार सादर करण्याची धुरा मारुतीनं पेलली. दमदार मायलेज, किमान देखभाल खर्च आणि दीर्घकाळ टीकणारं मॉडेल ही मारुतीची जमेची बाजू. मात्र सुरक्षिततेच्या निकषांवर या कारला इतर कंपन्यांच्या कार मागे टाकत होत्या.

मारतीची एक कार मात्र इथं अपवाद ठरली. नुकतंच सेकंड हँड कारची विक्री आणि खरेदी करण्याची सुविधा पुरवणाऱ्या ई कॉमर्स संकेतस्थळाच्या एका सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार मारुतीच्या कार किमान 5 वर्षे वापरल्यानंतरही जेव्हा रिसेल केल्या जातात तेव्हासुद्धा त्यांना चांगली किंमत मिळते. स्पिनीच्या सर्व्हेचा हवाला देत ऑटोकारनं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार हे सर्व कार मॉडेल भारतात फ्लीट व्हिकल म्हणून लोकप्रिय आहेत. ज्यांना इतर कारच्या तुलनेत चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत आहे.

70 टक्के रिसेल व्हॅल्यू आणखी काय हवं?

स्पिनीच्या सर्वेक्षणानुसार मारुती सुझुकीची डिझायर ही अशी कार आहे, ज्यामध्ये 5 स्टार सेफ्टी असून मागच्याच वर्षी कंपनीनं ही कार लाँच केली होती. कारची एक्स शोरुम किंमत 6.84 लाख रुपये इतकी असून, नव्या मारुती डिझायरमध्ये 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 80 bhp पॉवर आणि 112 Nm इतका टॉर्क जनरेट करतं. 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा पर्यायांसह ही कार सीएनजी पर्यायामध्येही उपलब्ध आहे. या कारचं पेट्रोल व्हेरिएंट  24.79 kmpl आणि CNG व्हेरिएंट 33.73 km/kg इतकं मायलेज देतं.

राहिला मुद्दा रिसेल व्हॅल्यूचा तर, मारुती डिझायच्या एकूण दरात 33 टक्क्यांची घट अपेक्षित होते. पण, सर्वेक्षणातील इतर कारच्या तुलनेत या कारची रिसेल व्हॅल्यू 70 टक्के आहे ही महत्त्वाची बाब. होंडा आणि टाटाच्या कारनाही मारुतीची ही बजेटमध्ये येणारी तरीही लक्झरी अनुभव देणारी कार आजही आघाडीवर आहे. त्यामुळं खिशाला परवडणारं हक्काचं वाहन खरेदी करायचं असेल तर मारुतीची ही कार तुमचं ‘डिझायर’ पूर्ण करेल यात शंका नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगालपासून काश्मीरपर्यंत 1500 किमी लांब मान्सून पट्टा तयार झाला:यामुळे उत्तर भारतात 1 ते 4...

0
मान्सूनने मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रवेश केला आहे. देशात आतापर्यंत 26 राज्यांना व्यापले आहे. यापूर्वी 24 जून रोजी...

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे...

0
पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत....

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

आषाढ महिना सुरू:देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू, 29 जुलैला गुरुपौर्णिमा; जाणून घ्या आषाढ महिन्याशी संबंधित...

0
आज (मंगळवार, 30 जून) पासून आषाढ महिना सुरू झाला आहे. हा हिंदू पंचांगातील चौथा महिना आहे. बुधवार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेसोबत आषाढ संपेल...
spot_img

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...
error: Content is protected !!