Homeमनोरंजनऑपरेशन सिंदूर पीआयबी फॅक्ट चेक सल्लागारांबद्दल बनावट हक्क चेक लोकांना त्यांच्या फोनवरील...

ऑपरेशन सिंदूर पीआयबी फॅक्ट चेक सल्लागारांबद्दल बनावट हक्क चेक लोकांना त्यांच्या फोनवरील स्थान सेवा बंद करण्याचा सल्ला देणार्‍या सल्लागारांबद्दल


फोनचे स्थान बंद करा तथ्य तपासणीः भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर दोन्ही देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानकडून मागील तीन दिवसांपासून ड्रोन हल्ले केले जात आहे. भारताने हे ड्रोन हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानकडून तुर्कीएकडून देण्यात आलेले ड्रोन भारताविरुद्ध वापरले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. असं असतानाच सोशल मीडियावर या ड्रोनसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ड्रोन स्मार्टफोनमधील लोकेशन ट्रेस करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच मोबाईल लोकेशन बंद करण्याचं आवाहन करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. मात्र याबद्दल आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. यापैकी अनेक बातम्या खोट्या आणि चुकीचे दावे करणाऱ्या आहेत. याच खोट्या माहितीविरोधात भारतीय सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाकडून फॅक्ट चेक अकाऊंट सुरु करण्यात आलं आहे. यावरुन खऱ्या आणि खोट्या बातम्या कोणत्या याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं जातं. “सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, आम्हाला अधिकृत ईमेल आला असून त्यामध्ये एक महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. तुमच्या मोबाईलमधील लोकेशन तातडीने बंद करा. असं लक्षात आलं आहे की ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ला करण्यासाठी जास्त लोकसंख्या असलेली ठिकाणं या लोकेशनच्या माध्मयातून हेरली जात आहेत,” असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

मोदी सरकारने काय म्हटलं आहे?

या व्हायरल पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करताना पीआयबी फॅक्ट चेकच्या खात्यावरुन हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. “मोबाईल लोकेशन बंद करण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्याचा दावा करणारी एक इमेज व्हायरल होत आहे. हा दावा खोटा आहे. अशाप्रकारचा कोणताही सल्ला भारत सरकारने दिलेले नाही,” असं या खात्यावरुन स्पष्ट करण्यात आलं आहे.

खोट्या माहितीपासून सावध

युद्धजन्य परिस्थितीमध्ये खोट्या माहिती आणि दाव्यांसंदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे. यासाठी अधिकृत स्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावं असं सांगितलं जात आहे. यामध्ये पीआयबी फॅक्ट चेकबरोबरच भारतीय संरक्षण दलांची अधिकृत सोशल मिडिया अकाऊंट्स, पीटीआय तसेच एएनआयसारख्या वृत्तसंस्थांचा अधिकृत माहितीचे स्रोत म्हणून समावेश होतो. या स्रोतांवरच विश्वास ठेवणं योग्य ठरु शकतं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!