Homeदेश-विदेशपाकिस्तान बिथरला! BLA च्या हल्ल्यानंतर लाहोरमध्ये साखळी स्फोट, सलग तीन स्फोटांमुळे हाहाकार

पाकिस्तान बिथरला! BLA च्या हल्ल्यानंतर लाहोरमध्ये साखळी स्फोट, सलग तीन स्फोटांमुळे हाहाकार


लाहोरमध्ये एकाधिक स्फोट: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक करत 9 दहशतवादी तळ उद्ध्व्स्त केली होती. भारताच्या या कारवाई जवळपास 90हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारताच्या या ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बिथरलेल्या पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील महत्त्वाचे शहर असलेले लाहोर बॉम्बस्फोटानी हादरले आहे. लाहोरमध्ये एकामागोमाग तीन बॉम्बस्फोट झाले आहेत.

लाहोरमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झालेत. या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. स्फोटांनंतर लाहोर शहरात सायरनचे आवाज ऐकायला मिळतायत.  या स्फोटांच्या घटनेनंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. हा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केलाय. या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समोर येत आहे. मात्र या हल्ल्याने पाकिस्तानात एकच हाहाकार माजला आहे.

पाकिस्तानातील लाहोरच्या वॉल्टन, गोपाल नगर आणि नसराबाद परिसरात आज स्फोटाचे आवाज ऐकण्यात आले. घटनास्थळी बचावपथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेच. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या परिसरात सलग तीन स्फोटांचे आवाज ऐकण्यात आले. हे हल्ले कोणी घडवून आणले हे मात्र अद्याप कळू शकलेले नाहीये.

पाक सैन्याच्या वाहनावर हल्ला

सूत्रांनूसार, पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर बचूल आर्मीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. बोलान येथील माच कुंड या भागात हा हल्ला करण्यात असून या हल्ल्यात 12 ते 14 पाक सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलएनं हा हल्ला केल्याचं यामध्ये उघड झालं. बलूच आर्मीच्या स्पेशिअल टॅक्टिकल ऑपरेश्न्स स्क्वाड (STOS) नं पाकिस्तानच्या लष्करी वाहनाला निशाणा करत रिमोट कंट्रोल आयईडी स्फोट घडवून आणला.

पाकिस्तानात घबराट

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात घबराट असल्याचे पाहायला मिळते. प्रचंड गोंधळानंतर सियालकोट शहर रिकामं करण्यात आलं आहे. तर रावळपिंडी, लाहोरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.

पाकिस्तानात आणीबाणी

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय.. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील सर्व रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. सर्व कर्मचा-यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्यात. तसंच पाकिस्तानातील अनेक शहरात नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आलाय. मुल्तान, फैसलाबाद, इस्लामाबाद, बहावलपूरमध्येही नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आलाय..





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!